पिंपळेगुरव, दि.१ :- पिंपरी-चिंचवड शहरातील समाजसेवक अरूण पवार यांना (दि.२९) पिंपरी चिंचवड पुणे येथील संवाद व्यासपीठ हरिशजी मोरे आणि मित्र परिवाराच्या वतीने खासदार श्रीरंग आप्पा बारने यांच्या हस्ते कार्य-कर्तृत्व पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

वृक्षमित्र अरुण पवार यांनी मराठवाडा जनविकास संघाची स्थापन करून २०१२ पासून लाखो वृक्षाची लागवड केली आहे. भंडारा डोंगर, देहूगाव मरकळ , शिंदेवाडी , पिंपळे गुरव , नवी सांगवी अशा अनेक भागांमध्ये वृक्षारोपण करून संगोपनाचे कार्यही करतात. विविध उपक्रमात लाखो रोपांचे दान केले आहे.

धारूर ते तुळजापूर बायपास, धारूर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर साखर कारखान्या पर्यंत हजारो वृक्षांची लागवड केली आहे. तसेच देहु-आळंदी येथील भंडारा डोगरावरही हजारो वृक्षारोपण करून संगोपन करणे चालू आहे. मराठवाडा जनविकास संघाच्या माध्यमातून गोरगरीब, मजदूर, अपंग, विद्यार्थी, शेतकरी,गो-शाळा, रानावनातील मुके प्राणी,देहु-आळंदीहून पंढरपूर कडे निघालेल्या पालख्यानां,संतानां, समाजसेवक, राजकारणी, तसेच समाजातील वंचितांसाठी काम करणाऱ्यांना आर्थिक मदत, बहुमोल साथ, मार्गदर्शन ते सदैव करत असतात. तसेच महाराष्ट्र शासनाने छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार, धारूर रत्न पुरस्कार,समाजभूषण पुरस्कार असे शेकडो पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.


 

 

 

 

 

 

 

 

#

Comments are closed

error: Content is protected !!