पिंपळे गुरव, दि,३:-  नवी सांगवी येथील ‘नवी प्राथमिक (टण्णू) शाळेत’ क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची १९३ वी जयंती साजरी करण्यात आली.यावेळी मुख्याध्यापिका लता सावळे व संजय मराठे हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून. जयंतीचे औचित्य साधून “दत्तक पालक योजना” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी शाळेतील २१ गरजू विद्यार्थिनींना सावित्रीबाई फुले ‘दत्तक पालक’ योजनेंतर्गत शाळेच्या फी रुपी निधीचे वाटप करण्यात आले.ही मदत निधी मुख्याध्यापक,शिक्षक,पालक तसेच समाजातील दानशूर व्यक्तीने यासाठी हातभार लावला.विशेष म्हणजे प्रशाळेतील तिसरी ते सातवीच्या विद्यार्थिनी आपल्या खाऊच्या पैशातून आपला खारीचा वाटा या कार्यक्रमासाठी उचलला.

याप्रसंगी बोलताना मुख्याध्यापिका लता सावळे यांनी जयंती व पुण्यतिथी का साजरी करायची याची माहिती सांगितली तर संजय गांधी निराधार योजनेचे संजय मराठे म्हणाले लोकनेते आमदार लक्ष्मण जगताप व शंकर जगताप यांच्या कार्यातून प्रेरित होऊन मी हे समाज उपयोगी मदत दरवर्षी करीत आहे.

या प्रसंगी सुनिल कोकाटे, शशीकांत नागणे, राजश्री पतंगे,वर्षा सोंडकर, संगीता कराते, उषा पोळ, मनीषा चांदेकर, सुनीता भिसे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन मुख्यध्यापिका लता सावळे व माधवी गुरव यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील दरेकर यांनी केले. वैशाली भालेराव यांनी मनोगत व्यक्त केले तर पूजा जमदाडे यांनी आभार मानले.


 

 

 

 

 

 

 

 

 

 

#

Comments are closed

error: Content is protected !!