पुणे,दि.४ :- साधू वासवानी रेल्वे उड्डाणपूल हा सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र शासन यांचेकडून सुमारे ५० वर्षापूर्वी बांधण्यात आलेला असून सद्यस्थितीत सदरचा पूल हा कमकुवत झाल्याने पुणे महानगरपालिकेमार्फत पुलाच्या दोन्ही बाजूस हाईट बॅरीअर टाकून सदरील पूल जड वाहतूकीसाठी बंद करण्यात आलेला आहे.
पुणे महानगरपालिका प्रकल्प विभागामार्फत कोरेगाव पार्क येथील साधू वासवानी रेल्वे उड्डाणपूल कमकुवत झाल्याने तो पाडून नव्याने बांधण्यात येणार आहे. त्याकरिता सदरचा पूल वाहतुकीकरिता बंद करणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रायोगिक तत्वावर दि. ०६/०१/२०२४ पासून पुढील १० ते १५ दिवस प्रायोगिक तत्वावर पुढे नमूद केल्यानुसार वाहतुकीची पर्यायी व्यवस्था करण्यात येणार आहे.
नगररोड – कोरेगाव पार्क – बंडगार्डन कौन्सिल हॉल – मोरवाडा या परिसरातील वाहतुकीमध्ये बदल करण्यात येणार आहे. काही रोड One Way व काही रोड No Entry करण्यात येणार आहेत.
सदरील बाबत Detail Notification पुणे पोलीस वाहतूक विभागामार्फत करण्यात येणार असून सदरचे बदल दि. ०६/०१/२०२४ पासून पुढील १० ते १५ दिवस प्रायोगिक तत्वावर करण्यात येणार आहे. तदनंतर वाहतुकीच्या Diversion चा अभ्यास करून अंतिम आदेश पुणे पोलीस वाहतूक विभागामार्फत निर्गमित करण्यात येणार आहे.
Comments are closed