सत्यशोधक चित्रपटास सर्वत्र गर्दी; नवयुवक वर्गाचा ऐतिहासिक चित्रपटाकडे कल वाढला.
पिंपरी, दि.७ :- पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपरी गाव येथील महात्मा फुले प्रतिष्ठान च्या वतीने रविवार (दि.७) दुपारील पूर्ण शो बुक करण्यात आला. त्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विशाल ई स्वेअर या चित्रपटगृहात या खास शोचे आयोजन करण्यात आले.
महाराष्ट्रात मागील काही वर्षांपासून ऐतिहासिक चित्रपटांस प्रेक्षक उत्तम प्रतिसाद देत असल्याचे पहावयास मिळत आहे. सत्यशोधक या चित्रपटात महात्मा फुले यांचा जीवनपट उत्तमरित्या उलगडला असल्याचे प्रेक्षक वर्गातून सांगण्यात येत आहे. तसेच आज वाचक वर्ग घटला असला तरी चित्रपट, मोबाईल, इंटरनेट च्या माध्यमातून नवी पिढी महापुरुष, इतिहास याविषयी माहिती घेत असतात तर कधी स्वतःची मतं मांडत असतात.
यावेळी प्रेक्षकांतून “जय जोति, जय क्रांती” च्या घोषणा दिल्या . यावेळी आप्पा बोराटे , बाळासाहेब बांगर , शिवा बागुल , डाॅ. राजेंद्र खेडेकर , प्रथमेश पांडे, शिरीष खेडेकर, जयराज मोरे, सिद्धेश्वर झाडबुट प्रवीण घरडे , सुधीर भालेराव इत्यादी उपस्थित होते.
महात्मा फुले समता प्रतिष्ठान पिंपरी दरवर्षी महापुरुषांच्या जयंती ,आरोग्य शिबीर, रक्तदान शिबिर असे इतर समाजाभिमुख उपक्रम राबवत असतात.
Comments are closed