जेजुरी,दि.१०:- शाळा आणि महाविद्यालयीन जीवनातच मूल्य शिक्षणाची रुजवण झाल्यास पुढे ती आयुष्यभर उपयोगी पडते. वक्तशीरपणा, संवेदनशीलता, देशभक्ती, सत्य, प्रेम, अहिंसा, समर्पणशीलता ,ज्ञान, भक्ती, कर्म इ. मूल्यांची ओळख आणि जोपासना आपण करीत राहिल्यास आपले जगणे आणि भवताल समृद्ध व विकसित करता येतो. जातीभेदाच्या आणि धर्मभेदाच्या पलीकडे जाणारी मूल्यदृष्टी विकसित करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन आकाश पाटील यांनी केली.
आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठानच्या जेजुरी येथील शरदचंद्रजी पवार महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग व सावित्रीबाई फुले विद्यापीठाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय मूल्य शिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी प्राचार्य डॉ. बालाजी नाटकरे , डॉ.रवींद्र पोमण , कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ.अरुण कोळेकर, उपप्राचार्य डॉ. बेबी कोलते ,प्रा. चंद्रशेखर काळे , प्रा. डॉ. नारायण टाक , आकाश पाटील प्रा. डॉ. रूपाली शिंदे, प्रा. डॉ. निर्मला तळपे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यशाळेत प्रा.डाॅ.नारायण टाक यांनी , भारतीय लोकशाही विरोधी मतांचा आदर करणारी असून निर्भीडता, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, स्त्री- पुरुष समानता, सर्वधर्मसमभाव, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय हे आपल्या लोकशाहीची मूल्ये आहेत. त्या मूल्यांचा आदर आणि प्रत्यक्ष कृतीतून सहजीवन आणि समाजजीवन अनुभविण्यास येणे ,यातच लोकशाहीचे यश आहे. असे विचार डॉ. नारायण टाक यांनी लोकशाही: एक मुल्य या विषयावर बोलताना व्यक्त केले.
प्रा.डाॅ.रूपाली शिंदे यांनी ,अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा मानवाचा मूलभूत हक्क आहे .स्वातंत्र्य हा अधिकार असला तरी अमर्याद स्वातंत्र्यामुळे सहजीवन धोक्यात येते. धर्मसंस्थेची जेव्हा चिकित्सा होते तेव्हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर ,बंधने मर्यादा घातली जाते. असे असलेप तरी धर्मचिकित्सा आणि रूढी परंपरेमधील अनिष्ट प्रथा आणि परंपरा यांची चिकित्सा करून विचार मांडण्याची आवश्यकता असते . हे काम आपल्याकडे अनेक संतांनी आणि समाजसुधारकांनी केले असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
कार्यशाळेच्या आयोजनामागील भूमिका प्रास्ताविकाच्या रूपाने कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. अरुण कोळेकर यांनी मांडली . मान्यवरांचे स्वागत व शुभेच्छा प्राचार्य डॉ.बालाजी नाटकरे यांनी दिल्या. आभार कार्यक्रम अधिकारी प्रा.चंद्रशेखर काळे यांनी मानले.प्रा.गौरी फडतरे, प्रा.पूनम कुदळे, प्रा.पूजा तावरे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. कार्यशाळेसाठी मु.सा. काकडे महाविद्यालय सोमेश्वरनगर, वाघिरे महाविद्यालय, सासवड शंकराव भेलके महाविद्यालय ,नसरापूर व जिजामाता जुनियर कॉलेज ,जेजुरी या ठिकाणचे विद्यार्थी सहभागी झाले होते.
Comments are closed