३ ऑगस्टला वाहनाचे योग्यताप्रमाण नूतनीकरणाचे कामकाज सुरु राहणार – उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे.
पुणे, दि.३१ ( punetoday9news):- पिंपरी चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहनाचे योग्यताप्रमाण नुतनीकरण तपासणीचे कामकाज चालू आहे. माहे मार्च ,एप्रिल, व जून या महिन्यात ऑनलाईन नियोजित तारीख घेतलेल्या वाहनांची तपासणी लॉकडाऊनमुळे झालेली नाही अशा वाहनांसाठी पुढील नियोजित तारीख कार्यालयामार्फत देण्यात आलेली आहे. दिनांक ३ ऑगस्ट २०२० रोजी रक्षाबंधन असल्याने विभागीय आयुक्त कार्यालय पुणे यांनी स्थानिक सुटटी जाहिर केलेली आहे. यामुळे नियोजित तारीख घेतलेल्या सर्व वाहनांच्या चालक/मालक यांची गैरसोय होऊ नये यासाठी ३ ऑगस्ट २०२० रोजी योग्यताप्रमाण नूतनीकरणाचे कामकाज चालू ठेवण्यात आले आहे. तरी सर्व वाहन चालक/मालक यांनी वाहन तपासणीसाठी कार्यालयात आणावे, असे आवाहन पिंपरी चिंचवडचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
Comments are closed