दापोडी,दि.१३ :- पिंपरी-चिंचवड शहरातील दापोडी येथे (दि. १३) जनता शिक्षण संस्थेचे संस्थापक वंदनीय दादासाहेब जगताप यांच्या जयंतीनिमित्त स्वामी विवेकानंद विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात स्नेहदिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जनता शिक्षण संस्थेचे माजी जनरल सेक्रेटरी लालासाहेब भुजबळ आणि संस्थेचे जनरल सेक्रेटरी प्रा. सुभाष जावळे उपस्थित होते. समवेत प्रशालेचे प्राचार्य रवींद्र फापाळे ,उपप्राचार्या मीनल घोरपडे, उपप्राचार्या रत्नप्रभा काकडे इत्यादी उपस्थित होते .
जनता शिक्षण संस्थेचे जनरल सेक्रेटरी प्राध्यापक सुभाषजी जावळे यांनी दादासाहेब जगताप यांच्याविषयी माहिती सांगून आपले मनोगत व्यक्त केले. शिक्षक मनोगतामध्ये सोनवणे यांनी दादासाहेबाविषयी माहिती सांगितली .
कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण प्रशालेचे प्राचार्य रवींद्र फापाळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप माकरे यांनी केले . प्रास्ताविक मीनल घोरपडे यांनी केले आणि आभार प्रदर्शन स्वाती देशमुख यांनी मानले .
सर्व शिक्षक व शिक्षकेतर बांधवांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाची सांगता विद्यार्थ्यांना तिळगुळ वाटप करून झाली.
जनता शिक्षण संस्थेच्या इतिहासात प्रथमतः सर्व शाखांमध्ये संस्थापक वंदनीय जयवंतराव बाबुराव जगताप उर्फ दादासाहेब या महान शिक्षण महर्षींचा जयंतीनिमित्त स्नेह दिन भव्य दिव्य स्वरूपात विद्यार्थ्यांच्या समोर संपन्न झाला. जनता शिक्षण संस्था ही जयवंतराव बाबुराव जगताप व त्यांच्या पत्नी जयंती उर्फमाईसाहेब जगताप यांनी सुरू केली हे आज विद्यार्थ्यांना समजले.
खऱ्या अर्थाने दादासाहेबांना आणि माई साहेबांना आज या संस्थेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी न्याय दिला आहे.
सर्व शाखांमधील सर्व शाखाप्रमुख, उपप्राचार्य, पर्यवेक्षक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी, सर्व शाखांमधील कार्यालयीन कर्मचारी वर्ग या सर्वांनी हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला.
– प्रा. जावळे सुभाष बुवा साहेब
जनरल सेक्रेटरी, जनता शिक्षण संस्था, पुणे.
कार्यक्रम विडिओ:-
Comments are closed