“राष्ट्रीय मूल्यांकन व अधिस्वीकृती मंडळ त्रिसदस्यीय समितीची भेट”

हडपसर, दि.१४ :- पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे विधी महाविद्यालय हडपसर येथे राष्ट्रीय मूल्यांकन आणि अधिस्वीकृती मंडळ (एन.ए.ए.सी),बेंगलोरच्या त्रिसदस्यीय समितीने भेट देऊन महाविद्यालयात राबविण्यात आलेल्या अभ्यासक्रम,अभ्यासक्रमपूरक, आणि अभ्यासक्रमाव्यतिरिक्त कार्यक्रमांचे आणि उपक्रमांचे मूल्यांकन केले.याचा निकाल
नुकताच जाहीर झाला असून महाविद्यालयास B++(CGPA 2.81) हे मानांकन मिळाले आहे.
त्रिसदस्यीय समितीचे अध्यक्ष पश्चिम बंगाल राष्ट्रीय न्यायशास्त्र विद्यापीठाचे
कुलगुरू, डॉ. निर्मल कांती चक्रबर्ती, तामिळनाडू डॉ.आंबेडकर विधी विद्यापीठचे प्रा.डॉ. संकर दामोधरण,जे.एस.एस.विधी महाविद्यालय मैसूर चे प्राचार्य डॉ. नटराजू एस. हे होते.
सप्टेंबर २०२३ मध्ये महाविद्यालयाने स्वयं अध्ययन अहवाल (एस.एस.आर) राष्ट्रीय मूल्यांकन व अधिस्वीकृती मंडळाला जमा केला होता. यामध्ये परिमानात्मक (क्वांटिटेटिव) मेट्रिकवे मूल्यांकन पूर्वीच झाले होते. तर उर्वरित गुणात्मक (क्वालिटेटिव) मेट्रिकच्या तपासणीसाठी त्रिसदस्यीय समितीने महाविद्यालयास 28 व 29 डिसेंबर 2023 भेट
दिली. समितीने 2017-18 पासून 2022-23 दरम्यान झालेल्या विविध उपक्रमांची, आणि उपलब्ध भौतिक व तांत्रिक सुविधांची सखोल तपासणी केली. तसेच विद्यार्थी, माजी विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्याशी संवाद साधून महाविद्यालयाच्या कामगिरीविषयी त्यांचे अभिप्राय जाणून घेतले.
महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.रंजना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली औद्योगिक दृष्ट्या संपन्न असलेल्या पुणे शहर व हडपसर तसेच ग्रामीण भागातील तरुणांना विधी क्षेत्रातील उच्च शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य महाविद्यालय करत आहे.तसेच महाविद्यालयामार्फत ग्रामीण भागात गाव दत्तक योजना,कायदेविषयक साक्षरता शिबिरे, साक्षरता अभियान आणि व्यसनमुक्ती अभियान महाविद्यालय राबवित असल्याचे गौरवोद्गार समितीने काढले. यावेळी विद्यार्थी केंद्रित अध्यापन पद्धती, अध्यापनात तंत्रज्ञानाचा वापर, ग्रंथालय, कमवा आणि शिका योजना,समुपदेशन, राष्ट्रीय सेवा योजना, परीक्षा विभाग, विद्यार्थी तक्रार निवारण कक्ष, प्लेसमेंट कक्ष, इतर महाविद्यालयाशी व संस्थांशी केलेले सामंजस्य करार इ. चे कौतुक समितीने केले.
अशाप्रकारे महाविद्यालयाला मिळालेल्या अभूतपूर्व यशाबद्दल महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. रंजना पाटील तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांचे कौतुक पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष,उपाध्यक्ष,मानद सचिव व इतर सर्व पदाधिकाऱ्यांनी केले.


 

दापोडीतील स्वामी विवेकानंद प्रशालेत दादासाहेब जगताप यांच्या जयंतीनिमित्त स्नेह दिन साजरा.

जेजुरी महाविद्यालयात मूल्य शिक्षण कार्यशाळा संपन्न

 

 

 

 

 

 

 

 

#

Comments are closed

error: Content is protected !!