पिंपरी,दि.१४ :-  पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे शिशुविहार प्राथमिक विद्यालयात शनिवार (दि.१३) रोजी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. शिशुवर्ग ते इयत्ता चौथी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग नोंदविला.

या स्पर्धांसाठी प्रमुख पाहुणे म्हणून कातोरे माजी प्राचार्य संत तुकाराम विद्यालय लोहगाव , गायकर उपप्राचार्य म्हाळसाकांत विद्यालय आकुर्डी व  धुमाळ हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
धावणे, विविध प्रकारच्या अडथळा शर्यती व मनोरंजक खेळ यांचा मनमुराद आनंद लुटण्याची संधी या क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळाली. प्रत्येक जण खिलाडू वृत्तीने व जिंकण्याच्या चुरशीने क्रीडा स्पर्धेत सहभागी झाला होता. विजेत्या खेळाडूंना प्राविण्य पदके देऊन पाहुण्यांच्या हस्ते गौरविण्यात आले .आपले मनोगत व्यक्त करताना कातोरे यांनी मुलांमध्ये खिलाडू वृत्ती वाढली पाहिजे, संघ भावना वाढली पाहिजे, जिंकण्याचा आनंद साजरा करताना पराजय ही पचवता आला पाहिजे हा या क्रीडा स्पर्धांचा मुख्य उद्देश आहे असे सांगितले.
तसेच प्रत्येकाने आपल्यातील बालपण जिवंत ठेवले पाहिजे व प्रत्येक क्षण भरभरून जगता आला पाहिजे . विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकार खेळण्याची, नियमित व्यायाम व सराव करण्याची सवय स्वतःला लावून घेतली पाहिजे असे त्यांनी सांगितले.
या क्रीडा स्पर्धांसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका योगिता काळे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदकिशोर ढोले , प्रिया बोरकर व मंजुषा बावधनकर यांनी केले . स्पर्धापरीक्षकाचे काम दिपाली मोहिते व आशा चव्हाण यांनी पाहिले. क्रीडा स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी सर्व शिक्षकांनी सहकार्य केले.


 

दापोडीतील स्वामी विवेकानंद प्रशालेत दादासाहेब जगताप यांच्या जयंतीनिमित्त स्नेह दिन साजरा.

 

 

 

 

 

 

#

Comments are closed

error: Content is protected !!