पुणे , ३१( punetoday9news):- लॉकडाऊननंतर पुणे शहर पुन्हा चालू होणार असून यासंदर्भात नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे .
५ ऑगस्ट पासून मोकळ्या मैदानात खेळावयाचे खेळ वगळता इतर खेळ जसे की गोल्फ , नेमबाजी , घराबाहेरील खेळ बॅडमिंटन , टेनिस , मल्लखांब सुरक्षित अंतर राखून खेळता येतील मात्र पोहण्यासाठी जलतरण तलाव बंदच राहतील. कॅब मध्ये वाहन चालक व ३ प्रवासी , रिक्षामध्ये वाहनचालक व २ प्रवासी , खाजगी चारचाकीमध्ये वाहनचालक व ३ प्रवासी अशी परवानगी आहे तर दुचाकीस्वाराने मास्क आणि हेल्मेट परिधान करने आवश्यक आहे.
प्रतिबंधित क्षेत्रात , कंटेन्मेंट झोनमध्ये अत्यावश्यक सुविधा पुरवणारी दुकाने ही स. ८ ते १२ आणि सायं. ५ ते ६ वा. पर्यंत उघडी राहणार आहेत .
प्रतिबंधित क्षेत्राबाहेरची दुकाने स. ९ ते सायं. ७ च्या दरम्यान p१ आणि p२ नियमाप्रमाणे उघडी राहतील व्यापाऱ्यांची p१ वन p२ रद्द करण्याची मागणी फेटाळली , मॉल्स आणि व्यापारी संकुले ५ ऑगस्ट पासून स. ९ ते ७ खुली राहतील मात्र मॉल्स मधील हॉटेल्स , सिनेमागृहे बंदच राहणार तर हॉटेल मधून खाद्यपदार्थ घरपोच पाठवता येतील , प्रतिबंधित क्षेत्राबाहेर अत्यावश्यक सुविधा पुरवणारी दुकाने स. ९ ते सायं. ७ या दरम्यान खुली राहतील.
Comments are closed