पिंपळे गुरव,२३ : – २३ जानेवारी रोजी अयोध्या मध्ये प्रभू श्रीरामांच्या मूर्तीचे प्राण प्रतिष्ठान झाले त्यानिमित्त महिलांनी सुयोग कॉलनी विनायक नगर येथील मुख्य रस्त्यावर सुंदर रंगीबिरंगी रांगोळ्या काढल्या तर बाल गोपालांनी सुंदर वेशभूषा करून हुबेहूब भूमिका केली.
यात प्रभू श्रीराम – देवांग शिंदे, सीता – दूर्वा शिंदे, लक्ष्मण – साईराज जगताप, राम भक्त हनुमान – विनीत इंगवले, कौशल्या – सई मराठे, श्रीरामांना बोरे खाऊ घालणारी शबरीची भुमीका – सिया मराठे हिने केली होती. तसेच अन्वी बोरकर, दूर्वा कुलकर्णी, अनया इंगेवल, विनया इंगवले, अश्विन केचे, म्यानिओल(मनू), आर्यन जगताप, अनुश्री केचे, जिजा भोसले, अद्वैत शिंदे, ओवी राऊत, ध्रुवीका खेडेकर, अन्वी कदम, आर्यन चव्हाण, आराध्या कांबळे, अन्वी विरकर, कार्तिकी शेंडे, ओम गाढवे त्यावेळी या सर्व बालगोपाळांना घेऊन सुयोग कॉलनीतील महिलांनी सुयोग कॉलनी व विनायक नगर मधून प्रभू श्रीरामयांची मिरवणूक काढली, मिरवणुकीत सर्व महिलांनी व बालगोपालांनी जय श्रीराम,प्रभू श्रीराम की जय,सीता मैया की जय,पवनसुत हनुमान की जय,अशा घोषणा दिल्या या घोषणांमुळे संपूर्ण वातावरण भक्तीमय व प्रभू श्रीराममय झाले या सर्व मनमोहक अविस्मरणीय दृश्यांचे चित्रीकरण शेकडो स्थानिक नागरिकांनी आपल्या मोबाईल मध्ये केले.
यावेळी महिला अध्यक्षा प्रिती मराठे म्हणाल्या की भाजप शहराध्यक्ष शंकरभाऊ जगताप यांनी एक कार्यक्रमात सांगितले होते की संस्कार टिकले तर संस्कृती टिकते,संस्कृती टिकली की धर्म टिकतो,आणि धर्म टिकला की देश टिकतो आणि देश टिकवायचे काम आपण सर्व करूया म्हणून आपण या बाल गोपालांना म्हणजे पुढच्या पिढीला या अशा धार्मिक व सांस्कृतिक गोष्टी पण शिकवल्या पाहिजेत म्हणजे त्यांच्यावर पुढे चांगले संस्कार होतील.
याप्रसंगी प्रिती मराठे,ज्योति शिंगाडे,नीलम कुलकर्णी,उज्वला पाटील,जयश्री जंगम,विद्या शिंदे,आशा आव्हाड,कल्पना खोपडे,अंजली जगताप,सुवर्णा भोसले,दीप्ती कुलकर्णी,मंगला म्हेत्रे,संगिनी काटकर,सारिका जगताप,रेखा जगताप आदी महिलांनी यामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद घेतला होता.
Comments are closed