पिंपरी, दि.२५ :- रेंजहिल्स ख्रिश्चन युथ असोसिएशनच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष वृक्षमित्र अरुण पवार यांना वृक्षमित्र पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
अरुण पवार यांनी मराठवाडा जनविकास संघाच्या माध्यमातून आतापर्यंत ४० हजाराहून अधिक झाडे लावून त्यांचे टँकरद्वारे पाणी घालून संगोपन केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
यावेळी जेष्ठ उद्योजक कृष्णकुमार गोयल, भोई प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. मिलिंद भोई, श्रुती पाटोळे, डॉ थॉमस डाबरे, राठोड, फादर रॉकी अल्फान्सो, आमदार सिद्धार्थ शिरोळे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. माजी नगरसेवक प्रकाश ढोरे, आनंद छाजेड, मनीष आनंद, पूजा आनंद, दुर्योधन भापकर, कार्तिकी हिवरकर, किशोर गाढवे, प्रदीप चांदेकर, रेव्ह. साळुंखे, प्रसाद सांगळे यांचाही कार्यक्रमात सन्मान करण्यात आला.
संस्थेचे अध्यक्ष सुधीर हिवाळे, सचिव सॅमसन जाधव, खजिनदार सॅम्युअल, सहसचिव सुभाष गायकवाड, अविनाश कांबळे, रेव्ह प्रमोद आंग्रे, रेव्ह सुमंत पाडळे, भास्कर गायकवाड, ॲड. विलास त्रिभुवन, विजय शिंदे, मिसेस जेसिंटा जाधव, संध्या आंग्रे, आरती भालेराव, मेबल आल्हाट, वेरोणिका त्रिभुवन, प्रिती शिंदे, महिमा शिरसाठ आदी यावेळी उपस्थित होते.
Comments are closed