पिंपरी, दि.२६ :-  प्रजासत्ताक दिनानिमित्त पिंपळेगुरव येथील शाळेत विशाल क्षीरसागर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. 26 जानेवारी हा दिवस संपुर्ण देशात प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. २६ जानेवारी १९५० रोजी संविधान लागू होऊन भारताला पूर्ण प्रजासत्ताक घोषित करण्यात आले. यंदा देशभरात भारतीय संविधान लागू होऊन ७४ वर्षे पूर्ण होत आहेत. यंदा आपण ७५ वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत.

या प्रजासत्ताक दिन कार्यक्रमा प्रसंगी ब्राइट पर्ल्स इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये प्रमुख पाहुणे म्हणून विशाल क्षीरसागर ( पोलीस फ्रेंड्स वेल्फेअर एसोसिएशन पुणे जिल्हा कार्याध्यक्ष ) , विनीत भोर तसेच मुख्याध्यापक गौरव वायदंडे उपस्थित होते.

क्षीरसागर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून पालकांचे आभार मानले. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी,पालक उपस्थित होते.


 

पुणे जिल्हा रुग्णालात प्रजासत्ताक दिन साजरा.

सांगवीत बालगोपालांनी साकारली रामायण वेशभूषा.

दापोडीतील स्वामी विवेकानंद प्रशालेत दादासाहेब जगताप यांच्या जयंतीनिमित्त स्नेह दिन साजरा.

 

 

 

 

 

 

#

Comments are closed

error: Content is protected !!