जनता शिक्षण संस्थेच्या विकास कामास सुरुवात!
पुणे, दि. २६ :- जनता शिक्षण संस्थेच्या श्री शिवाजी विद्यामंदिर आंबळे प्रशालेतील नवीन इमारत बांधकामाचा ठराव २६ जानेवारी रोजी संस्था पदाधिकारी व ग्रामस्थ यांच्या संयुक्त सभेत एकमताने मंजूर करण्यात आला.
आंबळे प्रशालेत संस्थेचे सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ यांची शाळेची नवीन इमारत बांधकाम करण्यासाठी संयुक्त सभा संपन्न झाली.
आंबळे प्रशालेची सध्याची इमारत अतिशय जीर्ण व मोडकळीस आलेली असल्याने आंबळे प्रशालेची नवीन इमारत बांधण्याचा मानस संस्था पदाधिकाऱ्यांनी केला.
आंबळे येथील ग्रामस्थ , सरपंच व उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य, आजी-माजी गावातील पदाधिकारी व संस्थेचे सर्व पदाधिकारी यांच्यामध्ये संस्थेच्या नवीन इमारत बांधणे कामी गेली महिन्यापासून चर्चा सुरू होती.
संस्थेने प्रशालेची इमारत बांधण्यास अनुकूलता दर्शविल्याने ग्रामस्थांनी देखील त्यास सकारात्मक प्रतिसाद दिलेला होता.
आजच्या संयुक्त सभेमध्ये भारत फोर्ज या कंपनीकडून ३ वर्ग खोल्या, ग्रामस्थांकडून २ दोन वर्ग खोल्या व संस्थेकडून २ वर्ग खोल्या अशा एकूण ७ नवीन आरसीसी वर्गखोल्या बांधण्याचा ठराव एकमताने संमत झाला. सदर इमारतीसाठी अंदाजे 70 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.
बांधकामाच्या पुढील प्रक्रिया सुरू करण्यासाठी फेब्रुवारी (दि. ८) रोजी होणाऱ्या संयुक्त सभेमध्ये इमारतीचा पूर्ण आराखडा व कागदपत्रांची पूर्तता करून लवकरच बांधकामास सुरुवात केली जाणार असल्याची माहिती जनता शिक्षण संस्थेचे जनरल सेक्रेटरी प्रा.सुभाष जावळे यांनी दिली.
या संयुक्त सभेस संस्थेचे अध्यक्ष माननीय जयप्रकाश जगताप, उपाध्यक्ष रमेश कार्ले, कार्याध्यक्ष महेश आगम, खजिनदार कविता गोरे, जनरल सेक्रेटरी प्रा. सुभाष जावळे, जॉईंट सेक्रेटरी रवींद्रनाथ नवले, असिस्टंट सेक्रेटरी प्रदीपकुमार नागवडे व राजेंद्र खरमाटे, ग्रामीण सदस्य हेमंत तांबे व बाळासाहेब पौळ त्याचबरोबर संस्थेचे माजी जनरल सेक्रेटरी लालासाहेब भुजबळ, जेजुरी प्रशालेचे प्रभारी प्राचार्य अनिल रासकर, सेवानिवृत्त लिपिक पुंडलिक रासकर, सुरेश आगम, सुभाष दरेकर, नंदू दरेकर, राजू रघावंत, शिवाजी गोरे, संजय बोबडे, जितेंद्र कोकणी, सुधीर बहिरट, सेवानिवृत्त शिक्षक दिलीप जगताप , धनसिंग जगताप प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर वृंद सदर सभेस उपस्थित होते. प्रशालेचे मुख्याध्यापक सुनील हेंद्रे यांनी सभेचे आयोजन केले होते.
Comments are closed