जांबे,दि.२६ : – कासेगाव एज्युकेशन सोसायटी संचलित द न्यू एज स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात झाला.
शाळेचे प्राचार्य जावेद पठाण सर यांच्या हस्ते ध्वज फडकविल्यात आला या तडूनंतर झेडयांस ध्वजास मानवंदना देण्यात आली. जिविका शिंदे, स्वरा होळकर, प्रणिती कानपिळे, स्वराज मोहिते, मुद्रा माने, आर्या ठेकळे, सोहम चोपडे या विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिन, संविधान, स्वातंत्र्य सेनानी, राज्य घटना, भारतीय नागरीकांची भूमिका या विषयी मनोगत व्यक्त केले.
आमना शेख यांनी प्रजासत्ताक दिनाचे महत्व आपल्या भाषणातून सांगितले. प्राचार्य पठाण सर यांनी मनोगत व्यक्त करून उपस्थितांचे आभार मानले.
या कार्यक्रमासाठी सर्व विदयार्थी विविध वेशभूषेत उपस्थित होते. पालक वर्गाची उपस्थिती लक्षणीय होती.
कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडव्यासाठी शिक्षक न शिक्षकेतर वर्गाचे योगदान मोलाचे होते.
Comments are closed