पिंपळेगुरव, दि. ३१ – प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेच्या माध्यमातून लाखो कारागिरांना लाभ होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली ही योजना १३ हजार कोटींची असून, या योजनेमुळे देशातील कारागिरांच्या आर्थिक उन्नतीसोबत त्याच्या परंपरागत कौशल्याची जपणूकही होणार आहे, असे प्रतिपादन पिंपरी-चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी केले.
लोकनेते दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त महाराष्ट्र नाभिक महामंडळ पिंपरी चिंचवड शहर व मगेशा ऍकॅडमी के प्लेक्स यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपळेगुरव येथील नटसम्राट कै. निळूभाऊ फुले नाट्यगृहात हेअर ऍण्ड केमिकल सेमिनार आयोजित करण्यात आले होते. तत्पूर्वी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या हस्ते प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेचे उदघाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र नाभिक महामंडळ पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष गणेश वाळुंजकर,प्रधानमंत्री विश्वकर्मा कोशल्य सन्मान योजनेचे संयोजक मगेश सूरवसे,दतात्रय ढगे,संजय गांधी निराधार योजनेचे संजय मराठे,स्नेहल राऊत,हेमंत श्रीखंडे,रविंद्र फुलपगारे,मदन तांदळे,इरफान शेख,संदीप दळवी,संदीप पंडीत,जितेंद्र चित्ते,महादेव मंडलिक,वसंत ढवळे,अमित रसाळ,राहुल रसाळ,विठ्ठल पंडीत, अशोक पंडीत,सोमनाथ शिंदे,किशोर पवार,शहाजी सूर्यवंशी, सुरेश मोरे, मारुती काटके यांच्यासह ५५० सलून व्यावसायिक बांधव उपस्थित होते.
शंकर जगताप म्हणाले, “प्रधानमंत्री विश्वकर्मा कोशल्य योजना सर्वसामान्य कारागिरांसाठी आहे. देशातील कारागिरांचे कौशल्य टिकावे आणि त्यातून त्यांच्या आर्थिक उन्नतीला चालना मिळावी असा प्रयत्न आहे.त्यासाठी त्याला ५ टक्के व्याजदराने चार वर्षांसाठी तीन लाख रुपयांपर्यंत कर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.त्यासोबत कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण देण्यात येणार असून दररोज ५०० रुपयांचे मानधन देण्यात येणार आहे. प्रशिक्षणाचे प्रमाणत्र देण्यात येणार आहे.उत्पादित वस्तूंना बाजार मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाच्या उन्नतीसाठी विविध योजना राबवितांना सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून योजना सुरू केल्या आहेत. ३२ कोटी नागरिकांचे जनधन खाते सुरू झाले आहेत.नागरिकांच्या सहभागातून देशात स्वच्छतेची चळवळ मोठ्या प्रमाणात राबविण्यात आली.कोविड काळात ८० कोटी गरीबांना मोफत धान्य देण्यात आले. आजही या गरीबांना मोफत धान्य दिले जात आहे. प्रधानमंत्री विश्वकर्मा कोशल्य सन्मान योजनेचा पिंपरी-चिंचवडमधील कारागिरांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.”
कार्यक्रमाचे प्रस्ताविक गणेश वाळुंजकर यांनी केले.सूत्रसंचालन तानाजी वाळुंजकर यांनी केले.मगेश सूरवसे यांनी आभार मानले.
महाराष्ट्रातल्या 6 जागांसह देशातल्या 56 राज्यसभा जागांसाठी निवडणूक जाहीर
Comments are closed