ठाणे,दि .१ ( punetoday9news ):-  महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील कल्याण शहरात ४८ वर्षांच्या रिअल इस्टेट डेव्हलपरची अज्ञाताने गोळ्या घालून हत्या केली आहे .

महात्मा फुले पोलिस स्टेशनच्या माहितीनुसार शुक्रवारी रात्री जिनेश ठक्कर यांना निवासी संकुलाजवळ दोन जणांनी गोळ्या घालून ठार केले.

ठक्कर यांना चार गोळ्या लागल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. या हत्येमागील व्यवसायातील वैमनस्य कारणीभूत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे . यासंदर्भात भादंवि कलम ३०२ (खून) आणि शस्त्रास्त्र कायद्याच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि आरोपींचा शोध चालू आहे .

Comments are closed

error: Content is protected !!