जेजुरी,दि.४ : – राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरातूनच विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास व नेतृत्व गुण वाढीला लागू शकतात. अशा शिबिरामुळे श्रमसंस्काराची जाणीव ,स्वयंशिस्त, विचारांची देवाणघेवाण ,खेड्यातील प्रश्नांची जाणीव आणि लोकसंवाद होण्यास मदत होते. त्यामुळे राष्ट्रीय सेवा योजनेचे श्रमसंस्कार शिबीर आयुष्यात बदल घडवून आणण्यास निश्चित उपयोगी ठरतात ,असे प्रतिपादन विजय कोलते यांनी केले.


शरदचंद्रजी पवार महाविद्यालय जेजुरीचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पांडेश्वर ता. पुरंदर जि. पुणे येथे नुकतेच युवकांचा ध्यास ग्राम-शहर विकास अंतर्गत लोकसंख्या नियंत्रण जनजागृती विशेष श्रमसंस्कार शिबिर संपन्न झाले .या शिबिराच्या समारोपप्रसंगी विजय कोलते बोलत होते.

कार्यक्रम प्रसंगी गावचे सरपंच किशोर लवांडे, बंडूकाका जगताप, माई कोलते, गौरव कोलते, प्राचार्य डॉ. बालाजी नाटकरे, उपप्राचार्य डॉ.बेबी कोलते , अरुण धुमाळ, रणजीत खारतोडे, उत्तम शिंदे ,किसन झेंडे, आबा थिकोळे, रियाज शेख, अनिल शेंडगे ,लक्ष्मण कुंभार, संतोष शिणगारे ,उल्हास नाळे ,सचिन नाळे, सतीश मचाले, संजय जगताप , मुकूट शेंडगे व सर्व आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
शिबिरार्थी विद्यार्थ्यांनी ग्रामस्वच्छता मोहिम, जनजागृती फेरी, गावचे सामाजिक व आर्थिक सर्वेक्षण, सांस्कृतिक कार्यक्रम ,व्याख्यानमाला, गटचर्चा , प्रबोधनात्मक नाटिका इ. कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते .
शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी माणिक झेंडे पाटील यांनी महाविद्यालयाने शिबिरासाठी पांडेश्वर ची निवड केल्याबद्दल आनंद व्यक्त करून शिबिरासाठी सर्वतोपरी मदत करण्याची भावना व्यक्त केली. संस्थेचे सचिव शांताराम पोमण यांनी शिबिर कालावधीत विद्यार्थ्यांनी गावाविषयी प्रेम निर्माण करण्याचे व गावातील प्रश्न समजून घेण्या विषयीचे आवाहन केले.
किशोर लवांडे यांनी शिबिराच्या आयोजनाबद्दल आणि विद्यार्थ्यांनी केलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले. उपस्थित मान्यवरांचे स्वागत प्राचार्य डॉ. बालाजी नाटकरे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. अरुण कोळेकर यांनी केले. सूत्रसंचालन कार्यक्रम अधिकारी प्रा.चंद्रशेखर काळे यांनी तर आभार प्रा. पुनम कुदळे यांनी मानले.
शिबिर यशस्वी होण्यासाठी प्रा. पूनम कुदळे, प्रा. गौरी फडतरे, प्रा.पुजा तावरे ,प्रा.मालुसरे , बाळकृष्ण मोकाशी, आकाश चाचर , सुरेश खरात , सुरेखा जगताप , श्याम पवार यांनी परिश्रम घेतले.

 


 

 

 

 

#

Comments are closed

error: Content is protected !!