पुणे,दि.५ :-  महाराष्ट्र राज्य भारत स्काऊटस् आणि गाईडस् राज्य संस्थेच्या मान्यतेने पुणे भारत स्काऊटस् आणि गाईड जिल्हा कार्यालय व शिक्षण विभाग जिल्हा परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २९ ते ४ या कालावधीत कब मास्तर व स्काऊट मास्तर प्राथमिक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन जिल्हा संस्था कार्यालय सदाशिव पेठ पुणे-३० येथे करण्यात आले होते.

या प्रशिक्षणात जिल्ह्यातील 16 कब मास्टर व 30 स्काऊट मास्टर यांनी सहभाग नोंदविला आहे.
समारोप कार्यक्रम प्रसंगी उपस्थित सर्व शिबिरार्थ्यांना माननीय माणिक बांगर जिल्हा आयुक्त स्काऊट तथा सहसचिव महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ राज्य मंडळ पुणे यांनी संवाद साधला. विद्यार्थ्याच्या जीवनाला आकार देणारे स्काऊट गाईडचे शिक्षण आहे त्यामुळे शालेय स्तरावर कार्य करताना स्काऊट गाईड विषयाची प्रभावी अंमलबजावणी करून आपली वेगळी ओळख निर्माण करण्याची संधी आपणास प्राप्त झाली आहे. त्याबद्दल सर्व प्रशिक्षणार्थी शिक्षकांचे अभिनंदन केले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्यात.
प्रशिक्षणार्थी कब मास्तर सुषमा वाकचौरे, स्काऊट मास्तर मुसाहेब शेख यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी शिबिर संचालक व स्काऊट प्रमुख रफेल जाॅन स्वामी, L.T.s , कब शिबिर प्रमुख बिरेश्वर पुजारी A.L.T.c तसेच शिबीर सहाय्यक म्हणून जिल्हा प्रशिक्षण आयुक्त स्काऊट दिलीप नेवसे, जिल्हा संघटक स्काऊट दिगंबर करंडे, शैलेश अभिमन्यू मून, श्रीमती विनयकुमारी कुमार, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
प्रशिक्षण शिबिरात गेस्ट लेक्चर म्हणून प्रशांत गायकवाड, जिल्हा प्रशिक्षण आयुक्त रायगड, जेष्ठ लीडर ट्रेनर सुरेश लोहार , सी- स्काऊट प्रमुख डॉ . गोपी शेट्टी यांनी सहभागी स्काऊटरना उत्कृष्ट मार्गदर्शन केले. त्याबद्दल जिल्हा संघटकांनी त्यांचे विशेष आभार मानले.
प्रशिक्षण शिबीरास नांदेडचे माजी जिल्हा चिटणीस बी.पी.कुदाळे, जेष्ठ सहाय्यक लीडर ट्रेनर नाथा मानकर यांची भेटी देऊन शिबिरार्थ्यांचा उत्साह वाढविला.
सदर शिबीर यशस्वीतेसाठी वरिष्ठ लिपिक विजयकुमार संचेती, संजय मलकुवार, शिपाई शहर संस्था अर्जुन मदने, यांनी अथक परिश्रम घेतले.

 


 

 

 

 

 

 

 

 

#

Comments are closed

error: Content is protected !!