पिंपरी,दि.८:- कोणत्याही राजकीय-सामाजिक कार्यक्रमावेळी,सणवार, उत्सव याप्रसंगी सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर महिला पोलीस १०-१२ तास कर्तव्यावर असतात.या दरम्यान त्यांना स्वच्छतागृहाची कोणतीही सुविधा पुरविली जात नाही, अशावेळी महिला कर्मचारी एखाद्या आसपासच्या घरामध्ये वाॅशरुम साठी विनंती करुन जावे लागते. त्यामुळे अनेकदा महिला कर्मचाऱ्यांची असुविधा होते.
या महिला कर्मचाऱ्यांची अडचन लक्षात घेऊन सामाजिक कार्यकर्त्या कु.संजीवनी पुराणिक यांनी मुख्यमंत्री कार्यालय व राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना याबाबतीत निवेदन दिले.
यामध्ये, सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर महिला पोलीस कर्तव्य असेल त्या ठिकाणी, लेडीज पोलिसांसाठी मोबाईल टॉयलेटचे योग्य व्यवस्थापन असावे, यात सॅनिटरी पॅड डिस्पोजेबल मशीन असावे. तसेच सर्व पोलीस स्टेशन मध्ये महिला पोलिसांसाठी स्वतंत्र रेस्टरूम असावे.
पोलिसांसाठी ही सुविधा देणे प्रत्येक पोलिस स्टेशनला बंधनकारक असावे अशी मागणी केली आहे.
Comments are closed