पुणे,दि.११ :-  पेरणे येथील श्री शिवाजी वाळके व पेरणे प्रशालेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या माध्यमातून रोटरी क्लब पुणे यांचे व्यवस्थापक चिटणीस व नाडकर्णी यांच्याकडून प्रशालेस अद्यावत संगणक लॅब देण्यात आली.


दि. १० रोजी संस्थेचे अध्यक्ष माननीय जयप्रकाश जगताप  त्याचबरोबर रोटरी क्लबचे अध्यक्ष नाडकर्णी यांच्या हस्ते लॅबचे उद्घाटन संपन्न झाले.  या कार्यक्रमास पेरणे गावच्या सरपंच वाळके , सर्व ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समितीचे आजी-माजी सदस्य, सर्व ग्रामस्थ, संस्थेचे तहयात सभासद उपस्थित होते.

रोटरी क्लबचे अध्यक्ष यांनी जनता शिक्षण संस्था विविध शाखांना सर्व प्रकारची मदत करण्याचे आपल्या मनोगतामधून आश्वासित केले.

संस्थेचे जनरल सेक्रेटरी प्रा. सुभाष जावळे यांनी संस्थेचा इतिहास व सद्य परिस्थिती आपल्या मनोगतातून व्यक्त केली.

कार्यक्रमाचे प्रास्तविक मुख्याध्यापक जाधव यांनी केले.
संगणक कक्षाचे उद्घाटन झाल्यानंतर संस्थेचे पदाधिकारी यांनी पेरणे गावातील ग्रामस्थ यांच्याबरोबर सहविचार सभा घेऊन शाळेच्या अडचणी व उपाययोजना यावर चर्चा केली. पेरणे गावचे सर्व ग्रामस्थ, सरपंच व दानशूर व्यक्तींनी शाळेच्या विकासासाठी सर्व मदत करण्याचे आश्वासित केले.
या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष माननीय जयप्रकाश जगताप , उपाध्यक्ष रमेश कार्ले, खजिनदार कविता गोरे, जनरल सेक्रेटरी प्रा.सुभाष जावळे, असिस्टंट सेक्रेटरी राजेंद्र खरमाटे व प्रदीपकुमार नागवडे हे उपस्थित होते.

 

 

 

 

#

Comments are closed

error: Content is protected !!