प्रीती संजय मराठे दांम्पत्यांचा स्तुत्य उपक्रम.
पिंपळेगुरव, दि.१२ :- भाजपा पिंपरी चिंचवड जिल्हाध्यक्ष शंकर पांडुरंग जगताप यांच्या मार्गदर्शनात पिंपळे गुरव येथील विनायक नगर मधील प्रीती संजय मराठे (माकर) यांनी पारंपरिक रीत जपत पौष महिन्यातील मकर संक्रांतीच्या सणानिमित्त हळदी कुंकू समारंभाचे आयोजन केले होते. या समारंभात महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला.
याप्रसंगी प्रीती मराठे यांनी समाजाप्रती सद्भावना जपत हळदी-कुंकू कार्यक्रमात महिलांना तुळशीचे रोप, कापडी पिशवी, विविध दैनिक वृत्तपत्र प्रत्येक सुवासिनी महिलांना वाण म्हणून भेट देण्यात आले. यावेळी प्लॅस्टिकचा वापर टाळा,कापडी पिशव्यांचा वापर करा. असा पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात आला. भारतीय संस्कृतीमध्ये तुळशीला खुप महत्त्व आहे म्हणून सर्व स्त्रियांना तुळशीचे रोप देण्यात आले. मोबाईलमुळे महिलांचे योग्य वाचन कमी झाले आहे. महिलांनी दररोज वाचन केल्यास भविष्यात वृत्तपत्रवाचन व पुस्तक वाचनाची क्रांती घडवू शकते. ‘वाचाल तर वाचाल’ हा सामाजिक संदेशही देण्यात आला. या अनोख्या उपक्रमाबद्दल परिसरातून मराठे दांपत्याचे कौतुक होत आहे.
यावेळी प्रीती मराठे (माकर) म्हणाल्या की, आज दैनंदिन जीवनात टीव्ही आणि मोबाईलचा जास्त प्रमाणात वापर होत चालला आहे. दररोज दैनिक वृत्तपत्रवाचून त्यातून ज्ञान घेण्याची आवड समाजातून कमी होऊ लागली आहे. याचा परिणाम पुढच्या पिढीवरती होऊ नये म्हणून ‘वाचाल तर वाचाल’ महत्त्व जाणून घेऊन आपण सर्वांनी रोज थोडेफार वाचन करणे आवश्यक आहे. त्यामुळे आपण आपल्या पासूनच सुरुवात करुया असा संदेश देण्यात आला.
याप्रसंगी प्रीती संजय मराठे (माकर),कल्पना वनशिव,कोमल गोंडाळकर,ज्योती शिंगाडे,नीलम कुलकर्णी,हर्षा चौधरी,शताब्दी फणसे, अंजली डावके, शिल्पा राऊत, करुणा खोपडे, जयश्री जंगम, ज्योती आव्हाड, उज्वला पाटील, शालीनी यादव, अपर्णा शेंडे, सीमा कांबळे, अंजली जगताप, ज्योती आगरवाल, ज्योती नाणेकर, संतोषी माने, प्रिया भोसले, रोहीनी कांबळे, शैलजा इंगवले, निवेदिता बाराथे, माया भोसले, सारिका खेडकर, संगीता पाचंगे आदी महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता.
Comments are closed