नवी सांगवी,दि.१३ : – नवी सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदानावर लोकनेते आमदार लक्ष्मण जगताप यांच्या जयंतनिमित्त भाजपा शहराध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर शंकरभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. नियोजनबद्ध अशा भव्य डे-नाईट क्रिकेट सामन्यांचे उत्तम नियोजन अजय दुधभाते,मनीष कुलकर्णी, निलेश जगताप, प्रवीण वाघमोडे, यांनी केले आहे.
लोकनेते आमदार लक्ष्मणभाऊ जगताप डे नाईट क्रिकेट चषक स्पर्धेतील मैत्रीपूर्ण रंगतदार सामन्यात सोमवारी रात्री आठ वाजता पत्रकार विरुद्ध सांगवी पोलीस यांचा सामना घेण्यात आला होता. या मैत्रीपूर्ण अटीतटीच्या सामन्यात सांगवी पोलीस संघाने बाजी मारत विजयाची बाजी मारली.प्रथम पत्रकार संघाचे कर्णधार संजय मराठे यांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत सांगवी पोलीस संघासमोर मोठी धावसंख्या उभारली. त्याचा पाठलाग करत सांगवी पोलीस संघानेही कडवी झुंज देत फलंदाजी केली.मात्र सांगवी पोलीस संघाची धावसंख्या रोखण्यात पत्रकार संघ अपयशी ठरला.
पत्रकार संघातील महादेव मासाळ,विजय गायकवाड , संदीप सोनार, सागर झगडे यांनी धावांचा डोंगर उभारला.उत्तम गोलंदाजी करताना प्रशांत माळसकर,हेमंत बाराथे यांनी सांगवी पोलिस संघातील दोन फलंदाज बाद केले.सांगवी पोलिस संघाने पत्रकार संघाच्या गोलंदाजीला प्रत्युत्तर देत शेवटपर्यंत कडवी झुंज दिली. सामन्यात संतोष महामुनी यांनी महादेव मासाळ यांना रनर म्हणून मोलाची साथ दिली.
मैत्रीपूर्ण अशा सांघिक खेळात पत्रकार संघाचे कर्णधार संजय मराठे यांनी गोलंदाजी करून तसेच संपूर्ण संघाकडून चांगले क्षेत्ररक्षणाचे नियोजन करून सांगवी पोलिसांची धावसंख्या रोखण्याचा प्रयत्न केला. विजय गायकवाड यांनी यष्टीरक्षक भूमिका पार पाडत पोलिस संघातील महत्वाचे दोन फलंदाजच्या झेल घेतल्यामुळे सामनाचे पारडे पत्रकार संघा कडे जाते की काय असे वाटत होते. देविदास शेलार,बलभीम भोसले यांनी उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केले.संगीता पाचंगे, प्रज्ञा दिवेकर,राजश्री पवार यांनी पत्रकार संघाला खेळाच्या दरम्यान प्रोत्साहित केले.
या खेळात उत्तम फलंदाजी व गोलंदाजी करत पोलिस संघाने विजय मिळवला. सांगवी पोलीस संघातील फलंदाज नारायण पाटील यांनी सर्वाधिक धावा करत मॅन ऑफ द मॅच किताब पटकावला.
सांगवी गुन्हे पोलीस निरीक्षक सुनील तांबे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. परिसरातील क्रिकेट रसिकांसाठी सुसज्ज सुविधापूर्ण अशा क्रिकेट सामन्याचे आयोजन व नियोजन केले आहे.त्याबद्दल क्रिकेट खेळाडू व प्रेक्षकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
पत्रकार संघातील फलंदाज खेळताना प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गडगडात पत्रकार फलंदाजांना प्रोत्साहित करत होते हे दुर्लभ चित्र आज सांगवी पीडब्ल्यूडी मैदानावर पाहायला मिळाले म्हणून आम्ही हा सामना हरलो जरी असेल तरी प्रेक्षकांच्या मनातला सामना जिंकलो आहे.
– संजय मराठे
कर्णधार पत्रकार संघ
सासवड : कऱ्हेकाठी रंगले कवी संमेलन.
भाषेविषयीची उदासीनता चिंताजनक बाब डॉ. अविनाश आवलगावकर
रोटरी क्लब पुणे यांचेकडून राधाकृष्ण विद्यालय पेरणे याप्रशालेस मिळालेल्या संगणक लॅबचे उद्घाटन.
Comments are closed