पुणे : दि.१३ :-  महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी प्रा . दिलीप ढमाले यांची व सचिव पदी आकुर्डी येथील म्हाळसाकांत प्रशालेचे प्रा . अशोक आवारी यांची एकमताने निवड करण्यात आली.

महाराष्ट्र राज्याचे महासंघाचे राज्याध्यक्ष शरदचंद्र धारूरकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेस पुणे , पिंपरी चिंचवड शहर व पुणे जिल्ह्याच्या अकरा तालुक्यातील बहुसंख्य क्रीडा शिक्षक उपस्थित होते . राज्यसचिव चांगदेव पिंगळे यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात संघटनेच्या आजपर्यंतच्या कार्याची माहिती दिली.

राज्याध्यक्ष धारूरकर यांनी शालेय क्रीडा व शारीरिक शिक्षण विषयाची आजची स्थिती विषद करताना महासंघाने आज पर्यंत केलेल्या संघर्षासह यापुढे निर्माण होणाऱ्या समस्यांना कसे सामोरे जावे लागणार आहे ? याबाबत सविस्तर माहिती दिली .

आर टी ई कायद्यांतर्गत क्रीडा शिक्षक भरती संदर्भातील समस्या, प्राथमिक व माध्यमिक स्तरात निर्माण झालेली दरी आणि त्यामुळे या क्षेत्रातील शिक्षण व शिक्षकांची होत असलेली अवहेलना याकडे प्रामुख्याने सर्वांचे लक्ष वेधलेआणि यापुढे येणाऱ्या सर्व समस्यांना सक्षमपणे पुढे जाण्यासाठी पुणे जिल्हा आघाडीवर राहावा, असे आवाहन केले .

शिक्षक भवन ,पुणे येथे झालेल्या सभेस राज्य कार्यालयीन सचिव सुरेश मुळूक, कमलाकर डोके ,सुरेश रणदिवे, मुकेश पवार, शोभा निकम, अनिता कुदळे, अंगदराव गरड, शिक्षक आघाडीचे मुरलीधर मांजरे ,राजेंद्र पितळीया आदी मान्यवर उपस्थित होते .

या सभेत पुणे जिल्हा संघटनेच्या नूतन कार्यकारिणीची सर्वानुमते निवड करण्यात आली .निवड झालेले पदाधिकारी व सदस्य पुढील प्रमाणे –

पुणे जिल्हा कार्यकारिणी

अध्यक्ष – दिलीप ढमाले

कार्याध्यक्ष – जयवंत थोपटे

उपाध्यक्ष – सुरेश खाटपे, अंकुश तावरे .

कोषाध्यक्ष – हर्षल निकम

सचिव – श्री अशोक आवारी

सहसचिव – श्री साबळे राजाराम .

संघटक – चंद्रकांत पारवे, नामदेव खडके, अमर बनसोडे.

विभागीय प्रतिनिधी –

उमेश बोराटे, कमलाकर डोके , फारुख शेख, अंगदराव गरड .पुणे

महिला आघाडी प्रमुख- 

शोभा निकम ( पुणे जिल्हा )

– अनिता कुदळे ( पुणे शहर )

– कविता आल्हाट( पिंपरी चिंचवड )

निमंत्रित सदस्य –

राजेंद्र शेटे , जीवन सोळंके , राहुल तावरे, रोहिदास भाडळे, गोविंद एडके , गजानन माकर .

वरील निवड झालेल्या सर्व नूतन कार्यकारिणीचे जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .

 


 

सांगवीत रंगला पत्रकार विरुद्ध पोलीस क्रिकेटचा सामना.

जिजाऊंनीच शिवरायांची जडणघडण केली : अजित पवार 

भाषेविषयीची उदासीनता चिंताजनक बाब डॉ. अविनाश आवलगावकर

महिला पोलिसांना मोबाईल टॅायलेट सुविधा मिळावी; सामाजिक कार्यकर्त्या संजीवनी पुराणिक यांची मागणी.

 

 

#

Comments are closed

error: Content is protected !!