नवी सांगवी,दि.१५ : – नवी सांगवीतील श्री अयप्पा हॉल मध्ये वसंत पंचमी निमित्त बुद्धी देवता म्हणजेच माता सरस्वतीचा दर वर्षीप्रमाणे बंगाली समाजातील बांधवांकडून माता सरस्वतीचे मूर्ती पूजन व होम हवन करण्यात आले.त्यानंतर आलेल्या भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.बंगाली समाजातील बांधव हे सरस्वती देवीचे नित्य नियमित पूजन करीत असतात.पण वर्षातील दोन दिवस मूर्तीची मनोभावे स्थापना करतात.पहिल्या दिवशी देवीच्या मूर्तीचे पूजा पाठ होम हवन व दुसऱ्या दिवशी आनंदाने देवीच्या मूर्तीचे विसर्जन करतात.
माता सरस्वती देवी ही बुद्धी देवता असून बंगाली समाजातील प्रत्येक विद्यार्थी आपल्या शाळेतील पहिल्या दिवसाची सुरुवात सरस्वती देवीचे पूजन करून शालेय जीवनाची सुरुवात करीत असतात म्हणून दर वर्षी बंगाली समाजाचे बांधव सरस्वती पूजाउत्सव मोठ्या थाटामाटाने करतात असे त्याप्रसंगी उपस्थित असणारे संजय गांधी निराधार योजनेचे संजय मराठे म्हणाले.यावेळी संजय मराठे आणि रवींद्र गावंडे पोलीस उपनिरीक्षक यांच्या हस्ते माता सरस्वती देवीची पूजा करण्यात आली.
यावेळी रवींद्र गावंडे पोलीस उपनिरीक्षक,संजय गांधी निराधार योजनेचे संजय मराठे,पोलीस नायक प्रवीण पाटील,शैलेश जाधव,रमेश चौधरी,रोहीत राऊत,बच्चू माल,सोमनाथ माल, मिठू माल,श्रावंती माल,झुमा माल,बिस्वजित माझी,संपा माझी, दुर्गा पात्रा,शिप्रा पात्रा,शिप्रा दास,प्रिया माल,पूजा माल,झुंपा आस,पोम्पा बेरा,अपर्णा तुरे,सुबीर पात्रा,पिंटू पात्रा,बेचू माल,पलाश माल,बिस्वजित माझी,सुबीर पात्रा,पिंटू पात्रा,तूला दास,मीथून दास,विभूती बेरा आदी मान्यवर व बंगाली समाजाचे नागरिक उपस्थित होते.
Comments are closed