पुणे,दि.१९ :- वडगाव शेरी येथील श्री आनंद ऋषी महाराज माध्यमिक विद्यालय आयोजित शिवजयंती कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून स्वराज्य संग्रामचे अध्यक्ष महेश लाड बोलत होते. यावेळी त्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून शिवघोषात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी शिवजयंती निमित्त सकाळी वडगाव शेरी येथील मुख्य रस्त्यावरून प्रभात फेरीचे आयोजन केले होते, तसेच अगोदर दोन दिवस निबंध स्पर्धा चित्रकला स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धांच बक्षीस वितरण महेश लाड यांच्या हस्ते करण्यात आले.
या स्पर्धेमध्ये तसेच प्रभात फेरीला मुला मुलींचा उत्साही सहभाग दिसून आला.
यावेळी बोलताना महेश लाड पुढे म्हणाले की, “इतिहासात रमुन न जाता शिवरायांकडून आपल्याला वर्तमानात काय करता येईल व भविष्याचा वेध कशा पद्धतीने घेता येईल यावरती विद्यार्थ्यांनी लक्ष दिले पाहिजे. एक काळ होता तेव्हा संरक्षणासाठी तलवार, भाले हे घेतल्याशिवाय घरातून बाहेर पडता येत नव्हतं. आता दिवस बदलले परिस्थिती बदलली आणि बदलत्या काळातले शस्त्र म्हणून लेखणी म्हणजे अभ्यास, ज्ञान हे ज्यांच्याकडे आहे त्यांचा नादाला कोणी लागत नाही आणि तेच भांडवल म्हणून आपण मैदानात उतरलो तर आपल भविष्य उज्वल आहे.”
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत कुलकर्णी सर यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणारे अशोक लंघे सर म्हणाले की, “शिवाजी महाराज हे डोक्यावर घेऊन नाचू नये किंवा डीजे समोर नाचण्यापेक्षा शिवाजी महाराज डोक्यात घ्या आणि आपले भविष्य उज्ज्वल करा.” यावेळी अनेक मुला मुलींनी चुणूकदार भाषण करीत कार्यक्रमात रंगत भरली. प्रशालेचे दुर्गे यांनी पोवाडा सादर करीत सर्वांची मने जिंकली.
यावेळी प्राथमिक माध्यमिक इंग्रजी व मराठी माध्यमाचे मुख्याध्यापक सुरज कुलकर्णी, अशोक लंघे, रेणुसे, चित्रा पवार, स्वराज्य संग्राम चे सचिव शरद मोरे व शिक्षक शिक्षिका, विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
हळदी कुंकू कार्यक्रमातून वाचनाचा संदेश.
जिजाऊंनीच शिवरायांची जडणघडण केली : अजित पवार
सासवड : कऱ्हेकाठी रंगले कवी संमेलन.
Comments are closed