पुणे,दि.१९ :- पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे विधी महाविद्यालय हडपसर येथे शिवजयंती व पालखी सोहळ्याचे आयोजन महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ रंजना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानद सचिव अॅड.संदीप कदम यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले. या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा.आमदार चेतन तुपे, पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख,मा.प्राचार्य डॉ.नितीन घोरपडे,मा. डॉ.दत्तात्रेय कुटे, शंतनु जगदाळे , प्राचार्य डॉ.अश्विनी शेवाळे आदी मान्यवर उपस्थित होते.
या सोहळ्याच्या प्रसंगी प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला सर्व मान्यवरांच्या हस्ते अभिषेक, प्रतिमा पूजन ,पुष्पहार अर्पण आणि महाराजांची आरती करण्यात आली. तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध कलाप्रकार सादर केले यामध्ये पोवाडा,भाषण,कविता इ. तसेच पारंपरिक वेशभूषा परिधान करून विद्यार्थ्यांनी शिवसाम्राज्यात चालत असलेले विविध प्रसंग सादर केले.
या सोहळ्यानिमित्त महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.रंजना पाटील यांनी विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची विधी व न्याय व्यवस्था तसेच भारतीय राज्यघटनेत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेला उल्लेख,तसेच मूल्यतत्वे, युद्धनीती,याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच डॉ.दत्तात्रय कुटे यांनी महाराजांचे नियोजन,संयोजन व मॅनेजमेंट गुरु या कौशल्याबद्दल मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष अॅड.संदीप कदम यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी घेतलेली शपथ,त्याचबरोबर महाराजांनी अतिशय थोड्या कालावधीमध्ये हिंदवी स्वराज्य उभा केले, यामध्ये त्यांनी केलेले विविध पराक्रम,गनिमी कावे,महिला सन्मान याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती व मार्गदर्शन केले. तसेच अॅड.संदीप कदम यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या.
शिवजयंतीचे औचित्य साधून महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.रंजना पाटील यांच्या संकल्पनेतून ‘उत्कृष्ट सेवक’ (निस्वार्थ सेवा)म्हणून नितीन तारू यांचा पाच हजार रुपये देऊन सन्मान करण्यात आला.तसेच क्रिकेट सामन्यांमधील विजयी संघांना प्राचार्य,प्रमुख पाहुण्यांच्या व अध्यक्षांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी,विद्यार्थी प्रतिनिधी,शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशुतोष कोलते आणि आभार सुवास कानगुडे यांनी केले.
शिवजयंती : आम्ही लेखनीरुपी तलवारी वाटतोय- महेश लाड
हळदी कुंकू कार्यक्रमातून वाचनाचा संदेश.
जिजाऊंनीच शिवरायांची जडणघडण केली : अजित पवार
Comments are closed