पिंपरी,दि.२० :- नवी सांगवीतील साई चौक येथे पिंपरी चिंचवड भाजपा जिल्हाध्यक्ष शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनात लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप भाजी मार्केट मध्ये शिवजयंती साजरी करण्यात आली.
इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारे राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.
यावेळी ज्ञानेश्वर खैरे व गणेश बनकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
याप्रसंगी गणेश बनकर म्हणाले की, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनिती विषयी भारतातच नव्हे तर अनेक देशांमध्ये विद्यार्थ्यांना शिकविले जाते त्यांच्या या महान कीर्तीचा आम्ही त्यांचे मावळे म्हणून सार्थ अभिमान आहे.
त्यावेळी लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप भाजी मार्केटचे अध्यक्ष संजय मराठे, ज्ञानेश्वर खैरे, गणेश बनकर, ललीत म्हसेकर, विशाल खैरे, कुणाल दिवार, रमेश डफळ, गणेश मते, अंकुश आपेट, भरत प्रसात, खंडेराव हल्लाले, सयाजी आगलावे, गणेश पैठणी, नितीन दोधाड,वैभव काळे,अरुण जाधव,बपीराम भोंगे,मनोज शिंदे,नवीन खान,एजास शहा,किरण वाणी,विपुल शिंदे,अंजना शिंदे,नंदा जाधव , भाजी विक्रेते व मान्यवर मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
शिवजयंती : आम्ही लेखनीरुपी तलवारी वाटतोय- महेश लाड
जिजाऊंनीच शिवरायांची जडणघडण केली : अजित पवार
महिला पोलिसांना मोबाईल टॅायलेट सुविधा मिळावी; सामाजिक कार्यकर्त्या संजीवनी पुराणिक यांची मागणी.
Comments are closed