पिंपळे गुरव,दि.२३ :-  सन १९०७ मध्ये एका इंग्रजी धैर्य वेड्या सैनिकाने सुरुवातीला २० मुलांच्या मदतीने इंग्लंडमध्ये निधर्मी, अराजकीय आणि सर्वधर्मसमभावाची शिकवणूक देणारी स्काऊट चळवळ उभी केली. या स्काऊट चळवळीचे जनक लॉर्ड बेडन पॉवेल यांची ही शिस्त, स्वावलंबन, शील संवर्धन जोपासणारी आंतरराष्ट्रीय गणवेशधारी चळवळ आज सुमारे सव्वाशे वर्षानंतर जगातील २०० पेक्षा अधिक देशांमध्ये विकसित झाली, प्रतिपादन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सहसचिव व पुणे जिल्हा स्काऊट आयुक्त माणिक बांगर यांनी दापोडी येथे केले.

दापोडी येथील स्वामी विवेकानंद विद्यामंदिर व डी टी पाटील कनिष्ठ महाविद्यालयात चिंतन दिनानिमित्त आयोजित केलेल्या एका कार्यक्रम प्रसंगी एसएससी व एचएससी बोर्डाचे सहसचिव माणिक बांगर यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले.

स्काऊट व गाईड चळवळीचे जनक लॉर्ड बेडन पॉवेल व लेडी बेडन पॉवेल यांचा 22 फेब्रुवारी हा जन्मदिवस जगभर चिंतन दिन म्हणून साजरा केला जातो. याचे औचित्य साधून दापोडी येथील स्वामी विवेकानंद विद्यामंदिर व डी टी पाटील कनिष्ठ महाविद्यालयातील स्काऊट विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या सर्वधर्म प्रार्थना सभेच्या कार्यक्रम प्रसंगी त्यांनी आपले विचार विद्यार्थ्यांसमोर मांडले.

दापोडी येथील स्वामी विवेकानंद विद्यामंदिर येथे चिंतन दिनानिमित्त एसएससी व एचएससी बोर्डाचे सहसचिव माणिक बांगर यांच्या समवेत स्काऊटचे विद्यार्थी व शिक्षक

यावेळी व्यासपीठावर प्रशालेचे प्राचार्य रवींद्र फापाळे, उपप्राचार्य व गाईड कॅप्टन मीनल घोरपडे, आदर्श शिक्षिका पुष्पलता तिजोरे सोनवणे, वर्षा खरात, शिक्षक प्रतिनिधी स्वाती देशमुख, एसएससी बोर्डातील लेखनिक नरेंद्र गरत उपस्थित होते.

 या चिंतनदिनी लॉर्ड बेडन पॉवेल व लेडी बेडेन पॉवेल यांच्या प्रतिमेचे पूजन करून विद्यार्थ्यांनी हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन व बौद्ध धर्माच्या प्रार्थना एकाच व्यासपीठावरून म्हटल्या. शालेय विद्यार्थी व शिक्षकांबरोबर पालकही यात सहभागी झाले होते.

स्काऊट विभाग प्रमुख मिलिंद संधान यांनी कार्यक्रमाचे नियोजन तर संदीप माकरे यांनी सूत्रसंचालन केले. हेमंत बगनर, राजू रघावंत, संजय शिरसाठ, शरद आव्हाड, अर्चना शिंदे व स्मिता गोडे यांनी कार्यक्रम यशस्वी केला.

दापोडी येथील स्वामी विवेकानंद विद्यामंदिर येथे चिंतन दिनानिमित्त एसएससी व एचएससी बोर्डाचे सहसचिव माणिक बांगर स्वागत स्काऊट स्कार्फ देऊन प्राचार्य रवींद्र फापाळे व स्काऊट शिक्षक मिलिंद संधान यांच्या हस्ते करण्यात आले

 


शिवजयंती : आम्ही लेखनीरुपी तलवारी वाटतोय- महेश लाड

सासवड : कऱ्हेकाठी रंगले कवी संमेलन.

आंबळे प्रशालेतील नवीन इमारत बांधकाम ठराव संयुक्त सभेत एकमताने मंजूर.

 

 

 

#

Comments are closed

error: Content is protected !!