पुणे जिल्हा परिषद आयोजित यशवंतराव चव्हाण आंतरशालेय बालनाट्य स्पर्धा. (२०२३-२४) या स्पर्धेची जिल्हास्तरीय अंतिम फेरी दिनांक १४ व १५ फेब्रुवारी रोजी बी. टी. शहाणी हायस्कूल, भवानी पेठ, पुणे येथे संपन्न झाली.
या स्पर्धेचा निकाल नुकताच घोषित झाला असून या स्पर्धेत संत तुकाराम नगर, पिंपरी येथील भारतीय जैन संघटना प्राथमिक विद्यालयाने सादर केलेल्या “अमृतफळ” या बालनाट्याने पुणे जिल्ह्यात शहरी विभागातून खाजगी प्राथमिक या गटात “प्रथम क्रमांक ” पटकावला. त्याचबरोबर दिग्दर्शनाचे प्रथम पारितोषिक विलास गुंजाळ यांना तर उत्कृष्ट अभिनयाचे पारितोषिक पारस जाधव (भूमिका – महाराज ) व रूज्ञा जाधव (भूमिका – राघवेंद्र ) या विद्यार्थ्यांना घोषित झाले आहे. पारितोषिक वितरण समारंभ २७ फेब्रुवारी २०२४ मंगळवार रोजी सावित्रीबाई फुले सभागृह भवानी पेठ पुणे येथे होणार आहे,
“अमृतफळ ” या बालनाट्याचे लेखन व दिग्दर्शन विलास गुंजाळ यांनी केले. अपर्णा कुमठेकर, दीपिका सावंत, स्नेहलता वाडेकर यांनी नेपथ्य निर्मिती केली. नाटकातील कलाकार विद्यार्थी पुढीलप्रमाणे –
पारस जाधव ( महाराज), रूज्ञा जाधव ( राघवेंद्र), काव्या मोहोड ( महिपाल ), तृषा धाईंजे ( मंत्री १) , पार्थ तळेकर ( मंत्री २) , कृष्णा चोरघे ( माळी ), स्वराज माळी ( पुजारी), सर्वज्ञ तावरे (मुलगा ), आराध्या डुड्डे (मुलगी),स्वरा गायकवाड ( म्हातारा ), श्रद्धा तांदळे ( म्हातारी),सोहम मानकर ( सेवक १), ओम गायकवाड ( सेवक २) देवयानी भोसले (सूत्रधार १),आरोही गोत्रा ( सूत्रधार २) या विद्यार्थ्यांनी नाटकात आपल्या भूमिका बजावल्या.
नाटकाच्या यशस्वितेसाठी प्राथमिक विभागातील शिक्षक शैला बर्वे, प्रदीप बोरसे, अरुणा धिवार, सायली माने यांनी सहकार्य केले. मुख्याध्यापक संजय जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
सलग तीन वर्षापासून जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल पालकवर्ग व व्यवस्थापन समिती तर्फे सर्वशिक्षक व मुख्याध्यापक यांचे सत्कार करण्यात आले. पिंपरी शाखेचे प्राचार्य दिलीपकुमार देशमुख, उपप्राचार्य डॉ . राजेंद्र कोकणे, वाघोली शाखेचे प्राचार्य संतोष भंडारी, पर्यवेक्षक पांडुरंग पवार , प्रा. संपत गर्जे तसेच संस्थेचे प्रकल्प व्यवस्थापक सुरेश साळुंखे, शाळा समिती अध्यक्ष अरुण नहार व प्रबध समिती अध्यक्ष विलास राठोड तसेच संस्था अध्यक्ष शांतीलाल मुथा यांनी सर्व सहभागी बालकलाकारांचे हार्दिक अभिनंदन केले व बक्षीस देण्यात आले,
निधर्मी, अराजकीय व सर्वधर्म समभावाची शिकवणूक देणारी स्काऊट चळवळ : माणिक बांगर
सासवड : कऱ्हेकाठी रंगले कवी संमेलन.
Comments are closed