●आयपीएलच्या धर्तीवर खेळाडूंचा पॉईंट स्वरूपात लिलाव करण्यात आला.

● २० संघमालकांनी आपले संघ यातूनञञङ विकत घेतली.

सांगवी, दि.२८:- नवी सांगवीतील पीडब्ल्यु ग्राऊंड येथे भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप व प्रसिद्ध उद्योजक विजुशेठ जगताप यांच्या मार्गदर्शनात क्रिकेट स्पर्धा घेण्यात आली. या  भव्य दिव्य सामन्यांचे आयोजन लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप कला व क्रीडा अकॅडमी, मनीष कुलकर्णी, प्रवीण वाघमोडे, निलेश जगताप, अजय दूधभाते यांनी केले होते.

ही स्पर्धा सांगवी येथिल PWD मैदानात मोठ्या उत्साहात डे – नाईट स्वरूपात दि.८ ते २५ दरम्यान पार पडली . स्पर्धेत तब्बल ९६ संघ सहभागी झाले व १५० हून अधिक संघांनी खेळण्याची इच्छा दर्शवली या स्पर्धेत पहिल्या दिवशी प्रेक्षणीय सामना पुणे ४०+ vs सांगवी ४०+ हा खेळविण्यात आला. व पोलीस विरूद्ध पत्रकार हा एक प्रेक्षणीय सामनाही खेळवण्यात आला ही स्पर्धा 3 वेग वेगळ्या प्रकारात खेळविण्यात आली. सांगवी दापोडी प्रीमियर लीग ह्या फॉर्मेट मध्ये,पहिल्यांदाच आयपीएल लेव्हलच्या पद्धतीने खेळाडूंचा पॉईंट स्वरूपात लिलाव करण्यात आला व २० संघमालकांनी आपली संघमालकी विकत घेतली व हे सामने लीग पद्धतीने पार पडले ह्या फॉर्मेट मधील विजेते संघ,

प्रथम क्रमांक – MNC पिंपळे गुरव – 71,000
द्वितीय क्रमांक – फिनिक्स बॉईज जूनी सांगवी – 51000
तृतीय क्रमांक- जय गणेश योद्धा, नवी सांगवी – 41000
चतुर्थ क्रमांक – सक्सेस ग्रुप, जुनी सांगवी 31000
पाचवा क्रमांक – महालक्ष्मी वॉरियर्स, नवी सांगवी, 21000
ह्या फॉर्मेट मधील ,
बेस्ट बॉलर – मोहन पाटील चषक
बेस्ट बॅट्समन – ओमकार काशीद चषक
मॅन ऑफ द सिरीज – किरण गायकवाड स्पोर्ट्स सायकल व भव्य ट्रॉफी,

ह्या स्पर्धेतील दुसरा फॉर्मेट,पिंपरी चिंचवड टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन अंतर्गत
ह्या फॉर्मेट मध्ये तब्बल 40 संघ खेळले त्यात

प्रथम क्रमांक – लवेष 11 , रुपीनगर – 51000
द्वितीय क्रमांक – स्व. संतोषभाऊ जाधव प्रतिष्ठान, पिंपरी-41000
तृतीय क्रमांक- श्री 11 , रुपीनगर – 31000
चतुर्थ क्रमांक- ND स्पोर्ट्स, चिंचवडे नगर- 21000
पाचवा क्रमांक- दत्ता काका साने स्पोर्ट्स फाउंडेशन,चिखली -11000
ह्या स्पर्धेतील
बेस्ट बॉलर – अभय जाधव
बेस्ट बॅट्समन – अकिब पटेल, भव्य ट्रॉफी
मॅन ऑफ द सिरीज – समीर जगताप, भव्य ट्रॉफी व स्पोर्ट सायकल

ह्या स्पर्धेतील तिसरा फॉर्मेट, ओपन, ऐक आमदार ऐक संघ,
ह्या फॉर्मेट मध्ये तब्बल 32 संघांनी सहभाग घेतला व यातील

प्रथम क्रमांक – s j टायगर्स,आंबेगाव मंचर – 1,21, 000 रोख व भव्य ट्रॉफी
द्वितीय क्रमांक – सुखाई प्रतिष्ठान औंध-82, 000रोख व भव्य ट्रॉफी
तृतीय क्रमांक- PK ब्रियानी 11 हडपसर – 51, 000 व भव्य ट्रॉफी
चतुर्थ क्रमांक – श्रेयांक 11,चिखली -25000 व भव्य ट्रॉफी
ह्या फॉर्मेट मधील

बेस्ट बॅट्समन – सिद्धार्थ पिसाळ,भव्य ट्रॉफी
बेस्ट बॉलर- रोशन,भव्य ट्रॉफी

मॅन ऑफ द सिरीज – विशाल निघोट, भव्य ट्रॉफी व स्पोर्ट सायकल,

अशी बक्षीस वाटण्यात आली. यावेळी भाजपाचे माजी नगरसेवक शशिकांत कदम, संतोष कांबळे,सागर आंगोळकर, हर्षल ढोरे, जवाहर ढोरे,माजी स्वीकृत सदस्य महेश जगताप,संजय कणसे, सागर फुगे, संदीप नखाते,प्रसाद कस्पटे सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब करंजुले,दिलीप तनपुरे,सखाराम रेडेकर,संजय मराठे,राहुल जवळकर,रामदास कस्पटे,रमेश काशीद,शिवाजी कदम आयोजक कमिटी सर्व सदस्य,सर्व संघमालक व व्यवस्थापक आणि बहुसंख्येने क्रिकेट प्रेमी उपस्थित होते.

 

#

Comments are closed

error: Content is protected !!