पुणे,दि.३ :-  शिवछत्रपती क्रीडा संकुल पुणे येथील क्रीडा प्रबोधिनी विद्यालयातील कार्यरत शिक्षक प्रशांत आबणे यांना महाराष्ट्र शिक्षक पॅनल कडून राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला.

पुणे येथे कार्यरत असलेले शिक्षक प्रशांत आबणे यांनी नवोपक्रम तसेच विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देऊन गुणवत्तेच्या सार्वत्रिकरणासाठी विशेष प्रयत्न केले, तसेच तंत्रज्ञानावर आधारित अध्ययन आणि अध्यापन करणारे शिक्षक म्हणून नावारूपाला आले, शिक्षण विभागाच्या आणि क्रीडा विभागाच्या राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय उपक्रमामध्ये सरांनी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सहभाग घेतला. एन सी आर टी आणि एस सी आर टी तर्फे घेण्यात येणाऱ्या प्रशिक्षणामध्ये तज्ञ मार्गदर्शक म्हणूनही आपली भूमिका बजावली. विविध शैक्षणिक संस्था तसेच संघटना यामध्ये सर पदाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्याचबरोबर सामाजिक कार्याची आवड असल्याने रक्तदान शिबिर, प्रकल्पग्रस्त, पानशेत धरणग्रस्त लोकांसाठी इंटरविडा आणि यश संस्थेच्या माध्यमातून काम केले. केंदीय मानव संसाधन मंत्रालय वतीने नेहरू युवा केंद्र संघटन यांच्यासोबत अनेक सामाजिक आणि शैक्षणिक कार्य केलेली आहेत. राज्यस्तरीय मानवी हक्क संरक्षण आणि जागृती संस्थेमार्फत मानाचा मानवाधिकार पुरस्कार 2022 हा आबणे सरांना प्राप्त झालेला आहे.

वरील सर्व कार्याची दखल घेऊन शिक्षक फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संचलित महाराष्ट्र शिक्षक पॅनलच्या वतीने सन 2024 चा राज्यस्तरीय सेवासन्मान आदर्श शिक्षक पुरस्कार साठी प्रशांत आबणे यांची निवड करण्यात आली आहे, याबद्दल शिक्षक फाउंडेशनचे अध्यक्ष तसेच राज्यसमन्वयक प्रा .दीपक चामे आणि निवड समिती सदस्य विजया पाचपुते यांच्याकडून याविषयी माहिती तसेच निवडपत्र देण्यात आले. सदर पुरस्कार वितरण सोहळा नाशिक येथे 14 मे 2024 रोजी होणार असून प्रशांत आबणे यांचे या यशाबद्दल कौतुक केले जात आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे उपसंचालक तसेच क्रीडा प्रबोधिनीचे प्राचार्य माननीय  सुहास पाटील आणि देवधर क्रीडा प्रबोधिनीचे मुख्याध्यापक सोमनाथ ढाकणे यांनी याविषयी त्यांचे कौतुक केले आणि यशस्वी भावी जीवनाच्या शुभेच्छा दिल्या.

 

 

 

 

#

Comments are closed

error: Content is protected !!