पिंपरी दि.१( punetoday9news):- पिंपरी चिंचवड मधील सांगवी येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जन्मशताब्दी ही अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समिती व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती सांगवी, नवी सांगवी व पिंपळे गुरव यांच्या माध्यमातून साई चौक येथे उत्साहात सोशल डिस्टन्सिंग पाळत साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमासाठी माजी अध्यक्ष जयंतीचे अमरसिंग आदियाल, व माजी सचिव अँड नितनवरे ,विजय चौधरी, बाळासाहेब पिल्लेवार , गजानन कांबळे हे उपस्थित होते.
यावेळी सांगवी पोलीस स्टेशनचे निरीक्षक अजय भोसले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. भोसले आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, अण्णाभाऊ साठे हे साहित्यरत्न तर आहेतच तर त्याचबरोबर त्यांनी आपल्या पोवाड्यातून जनमानसात ज्ञानाची ज्योत पेटवली आज तिचे रूपांतर मोठ्या मशालरूपी प्रकाशात होत असून समाजाला नवी दिशा देण्याचे काम करत आहे. भारतीय स्वातंत्र्य्यानंतर उच्चवर्णीयांचे भारतावरील शासन त्यांना मान्य नव्हते म्हणून त्यांनी १६ ऑगस्ट १९४७ रोजी मुंबई येथे वीस हजार लोकांचा मोर्चा काढला होता आणि त्या मोर्च्यातील घोषणा होती, “ये आझादी झूठी है, देश कि जनता भूखी है!” ही घोषणा देत जनमानसाची कैफियत समोर आणली होती. असे सांगितले.
तसेच मातंग आघाडीचे भिसे, थोरात, युगप्रवर्तक संघाचे सचिव हरीश गायकवाड, लुंबिनी बुद्धविहाराचे बुद्ध विहार समितीचे अध्यक्ष मोहन कांबळे यांनी आपले विचार मांडले. संयुक्त जयंती महोत्सव यांचे कार्याध्यक्ष रवींद्र पारदे यांनी प्रस्तावना केली व सूत्रसंचालन राहूल काकडे यांनी केले तर आभार अमरसिंग आदियाल यांनी व्यक केले.
Comments are closed