दापोडी , दि.४ :- पिंपरी-चिंचवड शहरातील दापोडीतील स्वामी विवेकानंद प्रशालेत दि. 3 रोजी जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. प्राचार्य जयप्रकाश जगताप यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दापोडी प्रशालेमध्ये जयप्रकाश जगताप  यांचा वही तुला कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.


या कार्यक्रमसाठी जगताप घराण्यातील उषा जयप्रकाश जगताप,  चिरंजीव इंद्रजीत जगताप व सुन अंजली जगताप , नात मृदिणी जगताप उपस्थित होते. तसेच जनता शिक्षण संस्थेचे माजी सहसचिव आबासाहेब जंगले, माजी सहसचिव वसंतराव जगदाळे, माजी जनरल सेक्रेटरी लालासाहेब भुजबळ , तहयात सभासद शहाजीराव रानवडे , तानाजी चौंधे, माजी प्राचार्य सुदाम हिरवे इत्यादी उपस्थित होते.
त्याचप्रमाणे जनता शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष रमेश कार्ले, कार्याध्यक्ष महेशकुमार आगम, खजिनदार श्रीमती कविता गोरे, जनरल सेक्रेटरी प्रा. सुभाष जावळे, जॉईट सेक्रेटरी रवींद्रनाथ नवले, ग्रामीण सदस्य हेमंत तांबे इत्यादी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमास जनता शिक्षण संस्थेतील माजी व आजी प्राचार्य ,उपप्राचार्य, पर्यवेक्षक ,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले माजी प्राचार्य डी.बी.नवले आणि स्वाती देशमुख यांनी श्री शिवाजी विद्यामंदिर आंबळे प्रशालेतील बांधकामासाठी 51 हजार रुपये देणगी जाहीर करून त्याचा धनादेश संस्थेचे विद्यमान अध्यक्ष जयप्रकाश जगताप यांना सुपूर्द केला.
सदर कार्यक्रम जनता शिक्षण संस्थेचे जनरल सेक्रेटरी प्रा.सुभाष जावळे यांच्या मार्गदर्शनानुसार आणि दादामाई विचार मंचाच्या सर्व कार्यकर्त्यांच्या कल्पनेतून संपन्न झाला. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी दादामाई विचार मंचाचे सर्व कार्यकर्ते यांनी चांगल्या प्रकारे नियोजन केले.

 

 

 

 


 

 

 

 

 

 

#

Comments are closed

error: Content is protected !!