जेजुरी,दि.५ :-  वार्षिक स्नेहसंमेलनातून विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना संधी मिळते त्यातून त्यांच्या त्यांचा कलेकडे ओढा निर्माण होऊन त्याला ती कला आयुष्यभर जतन आणि जोपासता येते .त्यासाठी विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमाबरोबर आपल्यातील कला, क्रीडा या गुणांचा महाविद्यालयीन जीवनातच विकास करायला हवा, असे प्रतिपादन विजय कोलते यांनी केले.

जेजुरी येथील आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठानच्या शरदचंद्रजी पवार महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे वार्षिक स्नेहसंमेलन व क्रीडा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. त्याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष विजय कोलते , सचिव शांताराम पोमण ,विश्वस्त माई कोलते , सल्लागार समितीचे सदस्य, संभाजीराव काळाणे ,बाळासाहेब झगडे, अविनाश भालेराव, सचिन पेशवे , जेजुरी देवसंस्थांनचे विश्वस्त मंगेश घोणे,पत्रकार प्रकाश फाळके, आप्पा बयास ,प्राचार्य डॉक्टर बालाजी नाटकरे, उपप्राचार्य डॉ.बेबी कोलते उपस्थित होते.

कार्यक्रमात महाविद्यालयाने राबविलेल्या निबंध, वक्तृत्व, हस्ताक्षर ,सामान्य ज्ञान परीक्षा , विविध क्रीडा प्रकारांत प्रथम क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले .हर्षल पाटील व सिद्धी काळाणे यांचा क्रीडा नैपण्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांनी विविध प्रकारची नृत्ये, नाटिका, विनोदी , प्रबोधनात्मक कार्यक्रम सादर करून आपल्यातील कलागुणांचा आविष्कार सादर केला. त्याला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कार्यक्रमाच्या प्रसंगी वर्षभरातील कामकाजाचा आढावा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बालाजी नाटकरे यांनी घेतला .प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. कल्पना रोकडे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.डाॅ.शिवाजी भिंताडे ,प्रा.किशोरी ताकवले यांनी तरआभार प्रा. डॉ. बेबी कोलते यांनी मानले. कार्यक्रमास पालक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. अशी माहिती महाविद्यालयाचे प्रसिद्ध प्रमुख प्रा.डाॅ.अरुण कोळेकर यांनी दिली.


 

 

भारतीय जैन संघटना प्राथमिक विद्यालयाचे बालनाट्य  ‘अमृतफळ’ पुणे जिल्ह्यात प्रथम.

प्रशांत आबणे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

 

 

 

#

Comments are closed

error: Content is protected !!