सांगवी, दि.११ :- जुनी सांगवीतील मराठी प्राथमिक शाळेत एक आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला . महिलांच्या आवडीच्या प्रिय अशा साड्या , दागिने यांचे विविध प्रकारचे छोटेसे प्रदर्शन यावेळी मांडले होते. तसेच परिसरातील राजकीय, सामाजिक, बँकिंग, संरक्षण, स्वच्छता अशा विविध क्षेत्रातील महिलांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास मा. नगरसेविका शारदा सोनवणे या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. तसेच दामिनी पथकातील सुनीता व स्वप्नाली , पीडीसीसी बँकेतील कर्मचारी रोहिणी झोरे , आरोग्य पर्यवेक्षक वैशाली रणपिसे असे मान्यवर उपस्थितीत होते. या सर्व क्षेत्रातील महिला भगिनींचा सन्मान तसेच सफाई कामगार महिलांचा सन्मान मुख्याध्यापक कल्पना सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यांच्याप्रती आदर व्यक्त केला. शाळेतील माता पालकांसाठी फ्रुट सॅलड डेकोशन, सादरीकरण व संगीत खुर्चीचे आयोजन केले व बक्षिसे देण्यात आली. याप्रसंगी मुख्याध्यापिका कल्पना सोनवणे यांनी माता पालकांना मार्गदर्शन केले. पदवीधर शिक्षक संतोष नवले यांनी माता पालकांची जबाबदारी याविषयी माहिती दिली व शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अश्विनी हाडवळे यानी केले. तर आभार प्रदर्शन ज्योती फापाळे यांनी व्यक्त केले.सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर यांच्या सहकार्याने महिला दिन साजरा झाला.
भारतीयांच्या विद्येची खरी देवता सावित्रीबाई फुले -डॉ. श्रीमंत कोकाटे
वृक्ष संवर्धन कार्याबद्दल वृक्षमित्र अरुण पवार यांचा ग्रीन महाराष्ट्र परिषदेत गौरव
जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जयप्रकाश जगताप यांची ७८ व्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त वहीतूला..
Comments are closed