जेजुरी,दि.१२:-  आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठानच्या जेजुरी येथील शरदचंद्रजी पवार महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि वाणिज्य विभाग आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ,पुणे राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने युवक युवती उन्नयणीकरण कार्यक्रमांतर्गत व्यवसाय विषयक मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न झाली.

या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर व्यवसाय व उद्योग क्षेत्राविषयी मार्गदर्शन व्हावे ,त्यांना त्याविषयीच्या वाटा सापडाव्या या उद्देशाने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यासाठी प्रा.डॉ. मेघा बडवे यांनी चला व्यावसायिक- उद्योजक होऊया आणि आजचे जागतिक मार्केट या विषयावर मार्गदर्शन केले .तर प्रा. डॉ.स्वप्नील कांबळे यांनी शेअर मार्केट काळाची गरज आणि आर्थिक साक्षरता या विषयावर आपले विचार मांडले. विद्यार्थ्यांना ही कार्यशाळा निश्चितच उद्योग- व्यवसायाच्या वाटा खुल्या करील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

कार्यशाळेच्या आयोजनामागील भूमिका प्रास्ताविकाच्या रूपाने राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ.अरुण कोळेकर यांनी विशद केली .वक्त्यांचा त परिचय वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. चंद्रशेखर काळे यांनी करून दिला‌ स्वागत उपप्राचार्य डॉ. बेबी कोलते यांनी केले. प्राचार्य डॉ. बालाजी नाटकरे यांनी कार्यक्रमाच्या संयोजनासाठी सहकार्य केले. कार्यक्रम समन्वयक म्हणून प्रा. गौरी फडतरी, प्रा. पूनम कुदळे यांनी काम केले .संयोजन श्री बाळकृष्ण मोकाशी, आकाश चाचर ,सुरेश खरात, श्याम पवार, सायली चाचर, सुरेखा जगताप ,यांनी केले .आभार प्रा. गौरी फडतरे व प्रा. पुनम कुदळे यांनी मानले. कार्यशाळेसाठी विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला , अशी माहिती महाविद्यालयाचे प्रसिद्धी विभाग प्रमुख प्रा. डॉ. अरुण कोळेकर यांनी दिली संस्थेचे अध्यक्ष विजय कोलते व सचिव शांताराम यांनी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी अशा कार्यशाळा होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.


 

भारतीयांच्या विद्येची खरी देवता सावित्रीबाई फुले -डॉ. श्रीमंत कोकाटे

वृक्ष संवर्धन कार्याबद्दल वृक्षमित्र अरुण पवार यांचा ग्रीन महाराष्ट्र परिषदेत गौरव

 

 

 

#

Comments are closed

error: Content is protected !!