पिंपरी, दि.२(punetoday9news):- पिंपरी चिंचवड मधील पिंपळे गुरव येथील सरस्वती भुवन इंग्लिश मीडियम स्कूलचा चा शैक्षणिक वर्ष २०१९- २० दहावीचा निकाल ९३% लागला .
गुणानुक्रमे प्रथम क्र. हर्षद रुपणार ९१.४०%, द्वितीय क्र. ध्यानी चोपडा ८८.७०%, तृतीय क्र. शार्दुल दिवर ८८% या विद्यार्थ्यांनी उत्तम गुण मिळवून यश संपादित केले.
शाळेच्या संस्थापिका जागृती धर्माधिकारी, सेक्रेटरी राजेश मनाकांत यांनी या मुलांचा सत्कार करत उज्ज्वल शैक्षणिक भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
प्रशालेतील इतर सर्व विद्यार्थ्यी ६० टक्के च्या वरील गुण मिळवणाऱ्या यादीत आहेत.
यशस्वी विद्यार्थी :-
प्रथम क्र.हर्षद रुपणार ९१.४०%
द्वितीय क्र.ध्यानी चोपडा ८८.७०%
तृतीय क्र.शार्दुल दिवर ८८%
प्रशालेची दरवर्षीप्रमाणे उत्कृष्ट वाटचाल होत असून सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना उत्तम मार्गदर्शन करून आदर्श विद्यार्थी प्रशाला घडवत आहे. त्याबद्दल माजी नगरसेवक शंकर जगताप व उद्योजक अरुण पवार यांनी शुभेच्छा दिल्या.
Comments are closed