चिंचवड,दि.२४ :- सुख आणि दुःख या दोन बाजू आहेत मात्र आपण दुःखाला पकडून ठेवतो हेच जीवनाचे खरे दुःख आहे.मनात जास्त काळ विचारांचा कचरा भरून ठेवणे चुकीचे आहे.असे विचार जैन मुनी उपाध्याय प्रवर प्रवीण ऋषी महाराज यांनी मांडले. होळी चातुर्मास निमित्त चिंचवड स्टेशन येथील सुखी धर्मसभा मंडप येथे विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन सकल पिंपरी-चिंचवड संघ्याच्या वतीने करण्यात आले आहे.
आज प्रवचन देताना जीवनात येणाऱ्या कटु प्रसंगाला आपण विसरले पाहीजे व राग,द्वेश सोडून प्रेमाने वागले पाहिजे.एकदा केलेली चूक पुन्हा पुन्हा त्याचे परिणाम भोगावे लागतात. मनात असलेले वैरभाव जास्त काळ टिकून ठेवणे त्रासदायक ठरते. यासाठी योग्य गुरुंचे सानिध्य व मार्गदर्शन जीवनाला दिशा देतात. याबाबत म.सा.यांनी आपले विचार मांडले.
कार्यक्रमाची सुरवात अर्हम ब्लिसफुल कपल शिबीराने झाली. होली चातुर्मास निम्मित विशेष प्रवचन,विशेष कार्यक्रम ‘ उड़ान’ अंतर्गत युवकांना विषेश व्यासपीठ तयार करून दिले. दुपारी गौतम प्रसादी चे आयोजन सुशीला खींवराज मुथा परिवाराच्या वतीने करण्यात आले. गौतम निधी परिवाराचे संमेलन घेण्यात आले.अर्हम नाईट या कार्यक्रमा साठी मधुर कंठी तीर्थेश ऋषी म.सा. यांनी धर्मचर्चा केली. श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ चिंचवड गाव व चिंचवड स्टेशन यांनी कार्यक्रमासाठी योगदान दिले.कस्ना डायग्नोस्टिक चे राजेंद्र मुथा व परिवाराने कार्यक्रमासाठी विशेष आयोजन केले.२८ तारखेला आचार्य राष्ट्र संत आनंद ऋषिजी म.सा.यांच्या पुण्यतिथि निमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याचा लाभ जास्तीत जास्त बांधवांनी घ्यावा असे आवाहन सकल संघ्याच्या वतीने करण्यात आले आहे.
Comments are closed