चिंचवड,दि.२४ :- सणासुदीचे दिवस आहेत.एकोपा जपत आनंदोत्सत्व करा. मात्र हे करत असताना समाजातील अस्थिर घटकाला सहकार्य करा.गरजु विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करा असे आवाहन चिंचवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद कोळी यांनी केले.

रमजान ,शिवजयंती ,धुलवड व गुढीपाडवा सनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. मिरवणूक काढल्या जातात.या प्रसंगी क़ायदा व्यवस्था सुरळीत रहावी, कोणतेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चिंचवड गावातील सर्व धर्मीय नागरिकांच्या चर्चा सत्राचे आयोजन चिंचवड पोलीस स्टेशन मधे करण्यातआले.या प्रसंगी शांतता समिति सदस्य व परिसरातील सामाजिक कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते. या प्रसंगी मार्गदर्शन करताना मिरवणूक दरम्यान हुल्लड़बाजी करू नये,स्पिकरच्या आवाजाच्या मर्यादा ठेवा, कार्यक्रमा साठी परवानगी घ्या तसेच रंगांची होळी खेळताना उत्सवाचा बेरंग होणार नाही याची काळजी घ्या,कोणाच्याही भावना दुःखणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सूचना देण्यात आल्या. समाजात एकोपा ठेऊन एकमेकांना सहकार्य करा असे आवाहन करण्यात आले.निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. राजकीय तेढ निर्माण होणार नाहीत याची काळजी घ्या,सोशल मिडियावर पोलीस प्रशासनाची करडी नजर आहे.याचा योग्य वापर करा अन्यथा चुकिला माफी नाही असा इशारा देण्यात आला. निरर्थक होणारा खर्च कमी करून समाजातील गरजु विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घ्या.पिंपरी-चिंचवड आयुक्तालया अंतर्गत विशेष मोहिम राबविल्या जात आहेत यात सहभागी व्हा असे आवाहन कोळी यांनी केले.या प्रसंगी पोलीस निरीक्षक (गुन्हे)प्रकाश जाधव यांच्या सह शांतता समिती सदस्य, सर्व धर्मीय नागरिक व पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येत उपस्थित होते.


 

 

 

 

 

 

#

Comments are closed

error: Content is protected !!