● व्हेरिटाज सॉफ्टवेअर टेक्नाॅलाॅजीस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि सांगवी परिसर महेश मंडळाचे विशेष सहकार्य.
पिंपरी, दि. ६ :- पिंपरी-चिंचवड शहरातील दापोडीतील स्वामी विवेकानंद विद्यामंदिर व डी.टी.पाटील कनिष्ठ महाविद्यालयास दहा लाख रुपये किमतीची अद्ययावत संगणक लॅब व्हेरिटाज सॉफ्टवेअर टेक्नाॅलाॅजीस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि सांगवी परिसर महेश मंडळाचे संस्थापक सतीश लोहिया यांच्या सहकार्याने मिळाली.
या अद्ययावत संगणक लॅबचे उद्घाटन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. प्रा. जयप्रकाश जगताप, खजिनदार कविता गोरे, जनरल सेक्रेटरी प्रा. सुभाष जावळे, जॉईंट सेक्रेटरी राजेंद्र खरमाटे, प्रदीपकुमार नागवडे इत्यादी संस्था पदाधिकारी उपस्थित होते. त्याचबरोबर सांगवी परिसर महेश मंडळ संस्थापक सतीश लोहिया, पुणे जिल्हा माहेश्वरी प्रगती मंडळ उपाध्यक्ष लक्ष्मीकांत मुंदडा , सचिव सतीश बजाज , व्हेरिटाज सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संजय माथुर, विजय म्हसकर, अमित स्थळेकर, सुवर्ण इनामदार , स्वप्ना थेटे, मंगेश काळे, भानु महती इत्यादी सदस्य उपस्थित होते. त्याचप्रमाणे माजी नगरसेविका शारदा सोनवणे, प्रशालेचे प्राचार्य रवींद्र फापाळे ,उपप्राचार्या मीनल घोरपडे ,उपप्राचार्या रत्नप्रभा काकडे ,पर्यवेक्षक प्रदीप पाबळे आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना संस्थेचे जनरल सेक्रेटरी प्रा.सुभाष जावळे म्हणाले कि, संस्थेच्या सर्वागीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत संस्थेच्या सर्व प्रशाला अधिकाधिक विकसित करणे यासाठी विविध उपक्रम, योजना राबविण्यात येत आहेत.
तर सतीश लोहिया म्हणाले कि सांगवी महेश मंडळ हे सातत्याने सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यक्रम राबवत असते. मंडळाच्या वतीने नेहमीच रक्तदान शिबिर आयोजित केली जातात. सामाजिक कार्यातही सहभाग नोदवला जातो तसेच भविष्यातील भारतीय नागरिक उत्तम घडावेत यासाठी शैक्षणिक क्षेत्रातही विविध उपक्रमांच्या माध्यमातून विविध प्रकारे विद्यार्थ्यांना मदत केली जाते.
लोकसभा निवडणूक विषयक तक्रारींसाठी ‘सी-व्हिजील’ ॲपची सुविधा
Comments are closed