निगडी,दि.६:- रुपीनगर येथे मराठवाडा युवा मंच यांच्या वतीने भव्य हरिनाम साप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकरांचे किर्तन ठेवण्यात आले आहे. सप्ताह सोहळ्याची सुरवात एकनाथषष्ठी दि. ३१ रोजी करण्यात आली.
हभप शिवाजी महाराज वठबे नांदेड, हभप लक्षमन महाराज पाटील, हभप पुरुषोत्तम महाराज पाटील, हभप.संग्राम महाराज भांडारे, हभप चंद्रकांत महाराज खळेकर, पांडुरंग महाराज गिरी, हभप उमेश महाराज दशरथे यांचे कीर्तन झाले.
रविवार दि.७ रोजी सकाळी १० वाजता सप्ताह सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून मनोज जरांगे पाटील उपस्थित राहणार आहेत. यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दुपारी दहा ते बारा या वेळेत सप्ताह सोहळ्याची सांगता श्रीक्षेत्र नारायण गड बीड येथील मठाधीपती हभप शिवाजी महाराज देशमुख यांच्या काल्याच्या कीर्तनाने होईल. अशी माहिती मराठवाडा युवा मंचाचे अध्यक्ष खंडू सगळे, उपाध्यक्ष सतीश कंठाळे,उपाध्यक्ष औदुंबर पाडुळे, सचिव सर्जेराव कचरे, कार्याध्यक्ष सोमनाथ मंडलिक, खजिनदार दीपक बोर्डे, खजिनदार उद्धव सरोदे, त्रिंबक मुळीक यांनी सांगितले.
यावेळी शहरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
दापोडीतील स्वामी विवेकानंद विद्यामंदिर प्रशालेत संगणक लॅबचे उद्घाटन.
लोकसभा निवडणुकीसाठी ११ हजार ८९८ मतदान यंत्रांची सरमिसळ
Comments are closed