विद्येविना मती गेली, मतीविना निती गेली…।। निती विना गती गेली, गती विना वित्त गेले…।। वित्तविना शुद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. 

 

पिंपरी,दि.७ :- पिंपरी चिंचवड शहरातील पिंपरीगाव येथे महात्मा जोतीराव फुले समता प्रतिष्ठान च्या वतीने थोर समाजसुधारक क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंती निमित्त भव्य शोभा यात्रा व विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

तरी परिसरातील सर्व नागरिक बंधु-भगिनींनी या नियोजीत कार्यक्रमांमध्ये बहुसंख्येने उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन करण्यात आले आहे.

 

 ?  स्थळ :- संत शिरोमणी सावता महाराज मंदिर पिंपरीगाव.

कार्यक्रमाची रूपरेषा

रविवार दि. ७/४/२०२४ सकाळी १०:३० ते दु.२:३० रक्तदान शिबीर व मोफत आरोग्य तपासणी

सोमवार दि. ८/४/२०२४ सकाळी १०:३० ते दुपारी २:३० मोफत आरोग्य तपासणी शिबिर

गुरूवार दि. ११/४/२०२४ सकाळी १०:०० ते ११:००  महात्मा जोतीराव फुले प्रतिमा पूजन

गुरुवार दि. ११/४/२०२४ सकाळी ११:०० ते दु. १२:०० महात्मा जोतीराव फुले स्मारकास पुष्पहार अर्पण

गुरूवार दि. ११-४-२०२४ रोजी सायं ६:०० ते रात्री १०:००. भव्य मिरवणूक  (मार्ग – गणेश हॉटेल ते तपोवन रोड मार्गे, माळी आळी चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक कुदळे पडाळ मार्गे पॉवर हाऊस चौक पिंपरीगांव.)

तरी वरील होणाऱ्या सर्व कार्यक्रमांमध्ये बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

महात्मा जोतीराव फुले समता प्रतिष्ठान पिंपरीगांव, समस्त ग्रामस्थ पिंपरीगाव . 


 

लोकसभा निवडणुकीसाठी ११ हजार ८९८ मतदान यंत्रांची सरमिसळ

रुपीनगर येथील मराठवाडा युवा मंच आयोजित भव्य हरिनाम सप्ताह.

भारतीयांच्या विद्येची खरी देवता सावित्रीबाई फुले -डॉ. श्रीमंत कोकाटे

 

 

 

 

 

 

#

Comments are closed

error: Content is protected !!