सांगवीत सकाळी बरेच नागरिक चालण्यासाठी घराबाहेर पडतात.10 ते 12 कुत्र्याचे टोळके बिनधास्त वावरतांना दिसतात. सर्वत्र भटक्या कुत्र्यानी उच्छाद मांडला आहे. मयूर नगरी जवळील कचरा कुंडी सकाळी ओसंडून वाहते. आरोग्य कर्मचारी आठ वाजता उचलतात पण परत भरते.दिवसातून दोनदा उचलण्याची अनेकदा आयुक्ता कडे मागणी केली त्याला प्रशासनाने  कचऱ्याची टोपली दाखवली. सकाळी कुडयांच्या ठिकाणी जास्त कुत्रे भटकंतांना दिसतात. पालीका कुत्र्याच्या लसीकरणावर खूप मोठ्या प्रमाणात खर्च करून ही कुत्र्याची संख्या जास्त प्रमाणात वाढताना दिसत आहे. कुत्रे पकडण्याचे प्रमाणात ही अत्यल्प असल्याचे यावरून दिसून येते. पालीकेने लसीकरण मोहीम व कुत्रे पकडण्याची मोहीम तीवृ करून नागरिकांची कुत्र्याची पासून होणारी शहरातील दहशत कमी करावी अशी मागणी शहराध्यक्ष आन्ना जोगदंड यांनी केली आहे

#

Comments are closed

error: Content is protected !!