नवी सांगवी, दि.१५ :- पिंपरी-चिंचवड शहरातील नवी सांगवीतील  लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप भाजी मार्केट येथे शंकरभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली.

सांगवी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामचंद्र गाडगे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर  गाडगे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

यावेळी भाजी मंडईचे अध्यक्ष संजय मराठे म्हणाले की कायदेतज्ञ डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेले कामगारांना मिळणाऱ्या प्राथमिक सेवा,कामगार राज्य विमा (ESI),कामाचे १२ तासावरून ८ तास, कामगार कल्याण निधी, महिला भगिनींसाठी प्रसूती पगारी रजा,स्त्रियांना मालमत्तेचा अधिकार,स्त्री-पुरुष समान काम व समान वेतन अधिकार,वडिलांच्या संपत्तीमध्ये मुलींना समान अधिकार,महिला कामगार सरंक्षण कायदा,मतदानाचा अधिकार,भारतीय सांख्यिकीक कायदा,तांत्रिक प्रशिक्षण योजना,आशा अनेक योजना नागरिकांसाठी दिल्यापण आज काही नागरिक अशा अफवा पसरवतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटनाच बदलणार आहेत म्हणून मी याप्रसंगी सर्वांना सांगू इच्छितो की असे काहीही होणार नाही कारण की बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेचा अभिमान फक्त आपल्या भारतालाच नसून तो पूर्ण जगभराला या घटनेचा हेवा वाटतो.

त्याप्रसंगी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामचंद्र घाडगे,लोकनेते लक्ष्मण भाऊ जगताप भाजी मार्केटचे अध्यक्ष संजय मराठे,रोहीत राऊत,संदीप पाटील,रमेश डफळ,गणेश मते,सुनील सावंत,अंकुश आपेट,भरत प्रसात,खंडेराव हल्लाले,सयाजी आगलावे,गणेश पैठणी,नितीन दोधाड,वैभव काळे,अरुण जाधव,बपीराम भोंगे,मनोज शिंदे,अजय पवार,नवीन खान,एजास शहा,किरण वाणी,विपुल शिंदे,अंजना शिंदे,नंदा जाधव आधी भाजी विक्रेते व मान्यवर उपस्थित होते.


वरंध घाट 30 मे पर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद – जिल्हाधिकारी.

लोकसभा सावत्रिक निवडणूक मतदानादिवशी मतदारसंघात सार्वजनिक सुट्टी ;कामासाठी बाहेर असलेल्या मतदारांनाही सुट्टी असणार.

लोकसभा निवडणूक विषयक तक्रारींसाठी ‘सी-व्हिजील’ ॲपची सुविधा 

 

#

Comments are closed

error: Content is protected !!