सासवड, दि.१७ : बाबासाहेबांवर बालपणी वडिलांनी केलेला वाचनाचा संस्कार, लावलेली शिस्त आणि वाचनासाठी दिलेले सतत उत्तेजन यामुळे भीमराव पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर बनू शकले.मॅट्रिक पास झाल्यावर त्यांच्या शिक्षकांनी केलेला सत्कार आणि भेट दिलेल्या बुद्ध चरित्राच्या वाचनाने बाबासाहेब आंबेडकरावर खोल परिणाम झाला. डॉ. बाबासाहेबांच्या वाचनाची शिस्त आणि ज्ञानावरील प्रगाढ निष्ठा विद्यार्थ्यांनी अंगीकारली पाहिजे. सासवड (ता. पुरंदर) येथील शासकीय वसतिगृहात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी उत्साहात साजरी करण्यात आली. डॉ.बाबासाहेबांनी घेतलेले शिक्षण, ज्ञानार्जनासाठी केलेले अपरिमित कष्ट, दलित समाज आणि एकूणच बहुजन समाजाच्या उद्धारासाठी त्यांनी केलेल्या कार्याची आठवण आपण सतत जागी ठेवली पाहिजे, असे प्रतिपादन प्रा. डॉ. अरुण कोळेकर यांनी केले.
वसतिगृहाचे गृहपाल विवेक जवळकर यांच्या मार्गदर्शनाखाली व वसतिगृहातचे सहायक अमित, सुपरवायझर अजित यादव यांच्या उपस्थितीत जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या वेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध यांचे प्रतिमा पूजन आणि बुद्ध वंदना करण्यात आली.
” विद्यार्थ्यांचे बाबासाहेब आणि बाबासाहेबांमधील विद्यार्थी ” या विषयावरील व्याख्यानातून प्रा.डॉ. कोळेकर यांनी बाबासाहेबांच्या विद्यार्थी दशेतील त्यांच्या चरित्रातील आठवणी सांगून बाबासाहेब कसे घडत गेले हे सांगितले. प्रतिकूलतेवर मात करण्यासाठी आणि कौटुंबिक, सामाजिक बदल घडविण्यासाठी उच्च शिक्षणाची आवश्यकता बाबासाहेबांनी अधोरेखित केली होती. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा ही बाबासाहेबांनी दिलेली त्रि-सूत्री विद्यार्थ्यांनी आत्मसात करायला हवी. बाबासाहेब यांचे विचार आणि कार्य नजरेसमोर ठेवून आपण आपली वाटचाल करायला हवी. तीच त्यांना खरी आदरांजली ठरेल असे विचार प्रा.डॉ. कोळेकर यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौरभ भोसले यांनी केले. परिचय मयूर पोटे यावेळी प्रज्वल इंगळे आणि आकाश इंगळे यांनी मनोगते व्यक्त केली. आभार किरण जाधव यांनी मानले.यावेळी विविध शाखातून पदवी शिक्षण घेणारे वसतिगृहातील विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी केले.
UPSC Result : महाराष्ट्रातील 87 हून अधिक उमेदवार यशस्वी
नवी सांगवीतील भाजी मंडईत डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी.
वरंध घाट 30 मे पर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद – जिल्हाधिकारी.
Comments are closed