सांगवी, दि.६ :- सांगवी परिसर महेश मंडळातर्फे कै.तुकाबाई जगन्नाथ लोहिया यांच्या स्मरणार्थ २९ व्या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. उन्हाळ्यामुळे असलेला रक्ताचा तुटवडा भागवण्यासाठी पिंपळे गुरव येथील निळू फुले नाट्यगृहातील बहुउद्देशीय हॉलमध्ये या शिबिराचे आयोजन करण्यात आले . 

रक्तदान शिबिराचे उदघाटन मंडळाचे ज्येष्ट सदस्य सुरेश टावरी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष सत्यनारायण बांगड ,सतीश लोहिया, संदीप लोहिया , निलेश अटल ,मुकुंद तापडिया , गणेश चरखा आदी उपस्थित होते.

रक्तदान शिबिरात १७६ रक्तदात्यानी रक्तदानाचे पवित्र कार्य केले. रक्तसंकलनसाठी पुना हॉस्पिटल व इंडियन सेरॉलॉजिकल रक्तपेढ़ीने सहकार्य केले.

शिबिराच्या यशस्वीतेसाठी दीपेश मालानी , कुलदीप बजाज, पंकज टावरी, गजानंद बिहाणी ,मनोज अटल यांनी सहकार्य केले.

 


 

#

Comments are closed

error: Content is protected !!