जेजुरी,दि.२५ :- जेजुरी गडावर कुलस्वामी खंडोबा मंदिरामध्ये वसंतोत्सवाच्या निमित्ताने दर वर्षीप्रमाणे मोगरा आणि सुवासिक फुलांचा वापर करून सजावट करण्यात येत आहे. श्री मार्तंड विजय ग्रंथामध्ये ‘श्रीं’च्या विविध पुजांचे विस्तृतपणे वर्णन केलेले आहे. यामध्ये दवणा पूजा, भंडार पूजा, पुष्प पूजा आदी पुजांचा उल्लेख आहे. त्या आधारावरच कुलस्वामी खंडोबा मंदिरातील वंशपरंपरागत हक्कदार श्रीपूजक गुरव पुजारी, वीर, कोळी, घडशी समाजाच्या वतीने ‘श्रीं’च्या विविध पूजा उत्सवाचे आयोजन केले जाते.
वैशाख महिन्यातील एका शनिवार आणि रविवारी ‘श्रीं’ना फुलांची सजावट आणि आरास केली जाते. यामध्ये वंशपरंपरागत हक्कदार श्रीपूजक गुरव पुजारी यांच्यावतीने सातभाई, बारभाई, दिडभाई, आगलावे यांनी पुढाकार घेतला, तर त्यांना कदम, मोरे आणि लांघी यांनी पुष्पोत्सव साजरा करण्यास मदत केली.
या उत्सवामध्ये श्री मार्तंड देवसंस्थानचे विश्वस्त मंडळ आणि कर्मचारी वृंद यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
SSC BOARD RESULT; सोमवारी इ. १० वी चा निकाल
Comments are closed