● उत्तम, उज्ज्वल निकालाची परंपरा कायम
● नवी सांगवी, सांगवी व पिंपळे गुरव परिसरातील 1987 पासूनची सर्वात जुनी इंग्रजी माध्यमाची शाळा.
नवी सांगवी :- जनता शिक्षण संस्थेच्या नवी सांगवीतील इंग्रजी माध्यमाची एस.जे.एच गुरुनानक हायस्कूल शाळेचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला. यंदाच्या वर्षी शाळेतून दहावीच्या परीक्षेला एकूण ६३ विद्यार्थी बसले होते. यामध्ये सर्व विद्यार्थी दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले.
परीक्षेत अनुक्रमे
प्रथम क्र. तन्वी काटे ९४ %
द्वितीय क्र. अस्मिता वासी ९३.६०%
तृतीय क्र. किरण बारटक्के ९२.६०%
चतुर्थ क्र. समृद्धी झोरे ९१.२०%
पाचवा क्र. दीप सपारिया ९०.६०%
गुण मिळवून उत्तीर्ण झाले.
यावेळी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शाळेच्या मुख्याध्यापिका नंदा काकडे, जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जयप्रकाश जगताप, उपाध्यक्ष रमेश कार्ले, कार्याध्यक्ष महेशकुमार आगम, खजिनदार कविता गोरे, जनरल सेक्रेटरी प्रा. सुभाष जावळे, जॉईट सेक्रेटरी रवींद्रनाथ नवले, असिस्टंट सेक्रेटरी राजेंद्र खरमाटे, प्रा. प्रदीपकुमार नागवडे, ग्रामीण संचालक हेमंत तांबे, बाळासाहेब पौळ या सर्व संचालक मंडळाकडून विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून कौतुक करण्यात आले.
https://youtu.be/PLSrLvi8Ppc?si=KwIan7-LI1kX7LB4
https://youtu.be/kPeFCScTLXw?si=qlMppHGQCmxOBBjJ
Comments are closed