चिंचवड, दि.२९ :-  दुर्गा टेकडी हे पिंपरी – चिंचवड शहरातील पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जात असून ह्या ठिकाणी अनेक प्रकारचे वन्य प्राणी तसेच पक्षी आढळतात. गेली कित्येक वर्ष हे माकड देखील दुर्गा टेकडी मध्ये राहत होते परंतु येणाऱ्या पर्यटकांनी ह्या माकडाला रोज कोल्ड्रिंक,बिस्कीट,वेफर्स आणि इतर शिजवलेले,तळलेले अन्नपदार्थ खायला देऊन त्याची ही अशी अवस्था केली.

उद्यानात फिरायला आलेल्या एका व्यक्तीने ह्या प्रकाराची माहिती स्केल्स अँड टेल्स वाईल्डलाईफ ऍनिमल रेस्क्यू फाउंडेशन,पुणे ह्या संस्थेस दिली. संस्थेतील सभासद घटनास्थळी पोहोचून माकडाची अवस्था पाहुन दुर्गाटेकडी मधील कर्मचारी ह्यांच्याकडे विचारपूस केल्यास असे निदर्शनास आले की सकाळी मॉर्निंग वॉक ला आलेले स्थानिक रहिवासी आणि उद्यानाला भेट देण्यास आलेले पर्यटक हे नियमांचे पालन करत नाहीत. प्राण्यांना खायला देऊ नका असे सांगितले असून देखील पर्यटक ऐकत नसून प्राण्यांना खाण्यास वेगवेगळे अन्नपदार्थ देतात. ही संपूर्ण घटना स्केल्स अँड टेल्स संस्थेच्या सदस्यांनी वनविभागला कळवून वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली माकडाला रेस्क्यू करण्याचे काम हाथी घेतले आणि 28 मे 2024 रोजी सायंकाळी 6 वाजता माकडाला सुखरूपपणे रेस्क्यू करण्यात आले. माकडाचे वजन खूप जास्त प्रमाणात वाढले असल्यामुळे त्याला पुढील उपचाराकरिता पुणे येथील महाराष्ट्र वनविभाग आणि रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट ह्यांच्या ट्रान्सिस्ट ट्रीटमेंट सेंटर येथे पाठवण्यात आले आहे.
आज कित्येक ठिकाणी ही अशी परिस्थिती निर्माण होत आहे. वन्य प्राण्यांना खायला देऊ नका असे फलक लावले असून देखील मनुष्य प्राणी हा नियमांचे पालन करत नाही. प्राण्यांना खायला देणे हे कृत्य भारतीय वन्यजीव संरक्षण आधिनियम 1972 नुसार गंभीर गुन्हात्मक कृत्य आहे, असे कृत्य केल्यास कायद्याने शिक्षा होऊ शकते किंवा दंड आकारला जाऊ शकतो. वन्य प्राण्यांना तळलेले,शिजवलेले अन्न दिल्यास त्यांच्या पाचनक्रियेमध्ये बदल होतात तसेच वारंवार आणि आयते मिळणाऱ्या अन्नाच्या साठ्यामुळे ते स्वतःचे अन्न शोधणे बंद करतात,त्यांची हालचाल कमी होते आणि पूर्णपणे मनुष्यावर अवलंबून राहतात. रोज मिळणारे अन्न जर अचानक बंद झाले तर त्यांच्या स्वभावात बदल होतो. अन्नपदार्थ हिसकावून घेणे,खायला न दिल्यास हल्ला करणे अशा घटना घडल्या जातात आणि ह्या घटनांना तसेच प्राण्यांच्या ह्या अवस्थेला पूर्णपणे जबाबदार हा मनुष्य प्राणी ठरतो. वजन वाढल्याने अनेक विकरांना त्यांना समोरे जावे लागते तसेच वाढलेल्या वजनामुळे चपळता कमी झाल्याने भटक्या कुत्र्यांच्या हाती लागून मृत्युमुखी पडतात किंवा गांभीर जखमी होतात.
वन्य प्राण्यांना,पक्ष्यांना खायला देणे हे बघायला जरी खूप चांगले वाटत असले तरी मुळात हे अयोग्य आहे. वन्य प्राण्यांना लांब अंतरावरून बघणे,त्यांच्या जवळ न जाने,त्यांना खायला न देणे ह्या गोष्टींचे पालन आपण केले पाहिजे अन्यथा वन्य प्राण्यांच्या अशा अवस्थेला जबाबदार देखील आपण मनुष्यच असू.


नवी सांगवीतील एस.जे.एच गुरुनानक हायस्कूलचा दहावीचा निकाल १०० %

श्री क्षेत्र जेजुरी गडावर पुष्पोत्सव साजरा.

 

 

 

 

#

Comments are closed

error: Content is protected !!